आम्हाला पूर्वसूचना न देता, तू सेल्फी का काढली, असा प्रश्न करुन आई आणि तिच्या मुलीला दोन महिलांनी रविवारी सकाळी बेदम मारहाण केली. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरा बाहेर हा प्रकार घडला.अर्चना महेंद्र म्हात्रे (ओमसाई प्लाझा, सागाव) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पिया भंडारी व प्रिया भंडारी (रा. ओमकार सोसायटी, संजयनगर, सागाव) या आई, मुली विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात अर्चना यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील काँक्रीट रस्त्यांवर पाणी मारले जात नसल्याने रस्त्यांना तडे

पोलिसांनी सांगितले, अर्चना म्हात्रे आणि त्यांची मुलगी रविवारी महाशिवरात्र असल्याने सागाव येथील पिंपळेश्वर महावदेव मंदिर येथे महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर अर्चनाच्या मुलीने मंदिर परिसरात सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये आरोपी महिलेची छबी आली. त्यामुळे आरोपी पिया आणि प्रिया या आई, मुलीने तक्रारदार अर्चना आणि तिच्या मुलीला आमचा सेल्फी का काढला, असे विचारुन मारहाण केली. प्रियंका हिने रस्त्यावरील दगड उचलून तो अर्चना हिच्या डोक्यात मारला. ती जखमी झाली आहे. किरकोळ कारणावरुन भांडण उकरुन काढून मारहाण केल्याने अर्चना यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे काल महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी होती. या काळात तेथे जत्रा भरली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother daughter beaten up in dombivli out of anger for taking a selfie amy