कल्याण – दररोज सांगुनही सून गर्भपात करून घेत नाही म्हणून संतप्त झालेल्या सासुने, जावेने आपल्या पोटावर लाथा मारल्या, अशी तक्रार गर्भवती असलेल्या कल्याण पूर्वेतील एका महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. कल्याण पूर्वेतील तिसगाव येथील साई दर्शन सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Kalyan Lok Sabha : शिंदे पिता-पुत्रांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे सुषमा अंधारेंसह ‘या’ युवा नेत्यांच्या नावांची चर्चा

रेखा भगवान लोकरे (३३) असे तक्रारदार सुनेचे नाव आहे. त्या नोकरी करतात. रेखा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवी मुंबईतील कामोठे येथे राहणाऱ्या सासु सविता रघुनाथ जावीर (४७), दीर सुरज रघुनाथ जावीर (२८), रोहित (२७), जाव दीपाली सूरज जावीर (२४), प्रकाश काशिनाथ गोरवे (४३, रा. कळंबोली), रोहित यांचा एक मित्र आणि एक अनोळखी महिला यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज, दीपाली, प्रकाश यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, रेखा लोकरे या गर्भवती आहेत. त्या कल्याणमधील आईकडे राहतात. त्यांनी गर्भपात करावा म्हणून तिची नवी मुंबईतील सासरची सासू, दीर, जाव ही मंडळी आग्रही आहेत. रेखा त्यांचे म्हणणे ऐकत नाही. सोमवारी रात्री जावीर कुटुंब नवी मुंबईतून कल्याणमध्ये रेखाला जाब विचारण्यासाठी आले होते. सोमवारी रात्री रेखा या दुचाकीवरून जात असताना दीर रोहित याने त्यांना खेचून पकडून ठेवले. जाव दीपाली, सासू सविता यांनी रेखाचे केस पकडून तिच्या पोटावर लाथा मारून आम्ही सतत सांगुनही तू गर्भपात का करून घेत नाहीस, असे बोलत रेखाच्या पोटावर लाथा मारल्या. दोघींनी तिला नखांनी बोचकारून तिला जखमी केले.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील कोळे गावात गावठी दारूचा साठा जप्त; दारूसाठी काळ्या गुळाला बाजारात मागणी

आरोपींच्या तावडीतून सुटका करून रेखा घरात बचावासाठी पळून गेल्या. त्यावेळी सात आरोपी बेकायदाशीररित्या रेखाच्या घरात घुसले. रेखाच्या आईला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच, रेखाला घरातही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. रेखा यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक यु. व्ही. जाधव तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law kicked on stomach of pregnant woman to abort child in womb zws
Show comments