भिवंडी येथील काल्हेर भागात २९ वर्षीय मुलाने त्याच्या विवाहित चुलत बहिणीच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. तरुणाचे त्याच्या विवाहित चुलत बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यास आईचा विरोध असल्याने त्याने ही हत्या केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

हेही वाचा >>>उल्हासनगर मधील लग्नाच्या व्हराडींना डोंबिवलीतील टोळीकडून मारहाण ; निळजे रेल्वे पुलावरील घटना

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड

काल्हेर येथे राहणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेचा काही चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी महिलेचा मृतदेह राहत्या घरात ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या गळ्याभोवती व्रण दिसत होते. तसेच कपाळावर मारहणीच्या खूणा होत्या. पोलिसांनी यासंदर्भात तरुणाची चौकशी केली असता, आपल्याला इमारतीखाली तीन ते चारजण मारहाण आणि लुटण्यास आले असताना तो वाद सोडविताना आईची हत्या झाल्याचे त्याने सांगितले. परंतु पोलिसांना त्यामध्ये तथ्य वाटत नव्हते.

हेही वाचा >>>डोंबिवलीत रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन मजूर ठार ; चार कामगार जखमी

दरम्यान, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी खबऱ्यांमार्फत माहिती घेतली त्यावेळी तरुणाचे त्याच्या चुलतबहिणीसोबत अनैतिकसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने चुलत बहिणीच्या मदतीने मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पट्ट्याने गळा दाबून हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

हेही वाचा >>> उल्हासनगर मधील लग्नाच्या व्हराडींना डोंबिवलीतील टोळीकडून मारहाण ; निळजे रेल्वे पुलावरील घटना

असा केला खून
मृत महिला एका खोलीमध्ये झोपली असताना तरुण आणि त्याची चुलत बहिण त्यांच्या खोलीत शिरले. तिथे त्यांनी पट्ट्याच्या साहाय्याने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी खोलीच्या सज्जामध्ये ठेवला. तरुणाने सज्जामधून इमारतीखाली उडी घेतली. त्यानंतर त्याने चुलत बहिणीला वरुन मृतदेह खाली फेकण्यास सांगितला. मृतदेह खाली पडल्यानंतर काही वेळाने त्याचे वडिल इमारतीखाली आले. त्यावेळी कृष्णाने बेशुद्ध होण्याचे सोंग घेतले होते. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि लहान भावाने महिलेचा मृतदेह आणि कृष्णाला घरात आणले. त्याला विचारले असता आपल्याला मारहाण करुन लुटण्यात आले. त्यावेळी झालेल्या वादात आईवर हल्ला झाल्याचा बनाव त्याने रचला.

Story img Loader