तान्हुल्याला रेल्वे फलटावर सोडून आई बेपत्ता; बाळ सुखरूप, महिलेचा शोध सुरू
मातृत्वाला कलंक लावणारी एक घटना वसईत उघडकीस आलीे आहे. दोन दिवसांच्या बाळाला वसई रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर टाकून एका महिलेने पलायन केले आहे. सफाई कर्मचारी महिलेला हे अर्भक दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
वसई रोड रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म क्रमांक एक हे निर्मनुष्य असते. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सफाई कर्मचारी महिला जरिना शेख (४५) सफाई करत असताना कोपऱ्यावरील सिमेंटच्या कठडय़ावर एक चादर गुंडाळलेलीे दिसलीे. जवळ जाऊन पाहिले असता त्यात एक नुकतेच जन्मलेले बाळ आढळून आले. या बाळाची नाळसुद्धा कापलेलीे नव्हतीे. हा प्रकार समजताच प्रवासी जमा झाले आणि रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. बाळ जिवंत असल्याने पोलिसांच्या लक्षात आले. तपासणीसाठी त्याला सुरुवातीला नवघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी बंगलीच्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसई रोड रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वसई रोड रेल्वे स्थानकात पूर्वी १६ सीसीटीव्ही होते आणि ४६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणीे बाळ सापडले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. वसई-विरार परिसरातीेल सर्व प्रसूतीगृहात जाऊन दोन दिवसांपूर्वी जन्म देणाऱ्या मातेचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे बाळ दोन दिवसांचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात बाळावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहोत. त्या दिवशीच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व चित्रण तपासले जात आहे. त्यातून काही दुवा मिळतो का ते आम्ही पहात आहोत.
– महेश बागवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस.

या तान्हुल्या बाळाला बुधवारी दुपारी अज्ञात महिला टाकून गेल्याचीे माहितीे मिळालीे. हे पुरूष अर्भक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणीे अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
– दीपक देवराज, पोलीस उपायुक्त, पश्चिम रेल्वे.

Story img Loader