दुचाकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ६५ लाख ६२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने विमा कंपनी आणि वाहन मालकाला दिले आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोपरखैरणे परिसरात हा अपघात झाला होता.
कोपरखैरणे येथून १८ मार्च २०२० ला संदेश शिंदे (३५) हे दुचाकीने त्यांच्या मित्रासोबत जात होते. त्यावेळी एका ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत संदेश यांच्या अंगावरून ट्रेलर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संदेश यांच्या कुटुंबाने वकिलांमार्फत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. दावेदारांच्या वतीने वकिल एस.टी. कदम यांनी बाजू मांडली.
हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी एक हजार वनराई बंधारे
संदेश हे एका खासगी कंपनीत कामाला होते. तिथे त्यांना दरमहा ३२ हजार ६५५ रुपये वेतन होते. ते घरात एकमेव कमावते होते. तसेच त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले आणि आई आहेत, असा युक्तिवाद त्यांनी न्यायाधिकरणासमोर केला. ट्रेलर मालक सुनावणीस उपस्थित झाला नसल्याने हा निर्णय दावेदारांच्या बाजूने करण्यात आला. तर, विमा कंपनीच्या वकीलांनी दाव्याविरोधात युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधिकरणाने ट्रेलर वाहन मालक आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वार्षिक ८ टक्के व्याजासह दावेदारांना रक्कम देण्याचे निर्देश दिले आहे.