ठाणे तसेच आसपासच्या शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सोमवारी दिवसभरात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लागत नसल्याने रहिवासी पोलिस कारवाईविषयी समाधानी नसल्याचे चित्र आहे.
डायघर येथील शिवलीगाव परिसरात अब्दुल कय्युम अब्दुल हकीम अन्सारी (४२) राहत असून त्यांनी इमारतीसमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. मोटारसायकल ३० हजार रुपये किमतीची होती. कल्याण परिसरात राहणारे डॉ. तुषार सकल पाटील (३२) यांनी स्टेशन रोड परिसरात उभी केलेली मोटारसायकल चोरीस गेली. मोटारसायकलची किंमत सुमारे १५ हजार आहे. उल्हासनगर येथील हिराघाट परिसरात राहणारे लखन जयरामदास मनवानी (२५) याची ५० हजार किंमतीची मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. या प्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात तीन मोटारसायकलींची चोरी
ठाणे तसेच आसपासच्या शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सोमवारी दिवसभरात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
First published on: 05-02-2015 at 01:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorbike theft in thane