ठाणे तसेच आसपासच्या शहरात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सोमवारी दिवसभरात ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लागत नसल्याने रहिवासी पोलिस कारवाईविषयी समाधानी नसल्याचे चित्र आहे.
डायघर येथील शिवलीगाव परिसरात अब्दुल कय्युम अब्दुल हकीम अन्सारी (४२) राहत असून त्यांनी इमारतीसमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. मोटारसायकल ३० हजार रुपये किमतीची होती. कल्याण परिसरात राहणारे डॉ. तुषार सकल पाटील (३२) यांनी स्टेशन रोड परिसरात उभी केलेली मोटारसायकल चोरीस गेली. मोटारसायकलची किंमत सुमारे १५ हजार आहे. उल्हासनगर येथील हिराघाट परिसरात राहणारे लखन जयरामदास मनवानी (२५) याची ५० हजार किंमतीची मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली. या प्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा