Town Park Thane : येथील कोलशेत भागातील सुमारे २० एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता याच भागात टाऊन पार्कची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या पार्कमध्ये मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्प यांचा समावेश असणार आहे. टाऊन पार्कच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनाने कोलशेत भागातील जागेचा आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला असून यानुसार अग्निशमन केंद्राचे आरक्षण रद्द करून ही जागा टाॅवर पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कल्पतरु विकासकाकडून हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानास नागरिकांची पसंती मिळत असल्यामुळे पालिकेने याच भागात मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहे. त्यापाठोपाठ आता कोलशेत येथील वरचा गाव परिसरातील ७.५४ हेक्टर जागेवर टाऊन पार्कची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या पार्कच्या माध्यमातून मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

Guardian Minister Hasan Mushrif submitted a copy of the notification of the decision to cancel Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्ग रद्द निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत अन् टीकाही
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस :  प्रक्रिया धुडकावून अधिसूचना
investment expected in textile industry
वस्त्रोद्योगात ९५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित; पीएलआय’मुळे परदेशी गुंतवणूकदारांतही वाढते आकर्षण
Democracy Day in Kalyan Dombivli Municipality cancelled due to code of conduct
आचारसंहितेमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकशाही दिन रद्द
temple Goregaon Mulund road, temple removed Goregaon Mulund road,
गोरेगाव मुलुंड जोडरस्त्याआड आलेले ४० वर्षे जुने मंदिर हटवले, पालिकेच्या विभाग कार्यालयाची कारवाई
Loksatta vasturang Skyscrapers are preferred in Pune news
पुण्यात गगनचुंबी इमारतींना प्राधान्य
12 applications for meeting at Shivaji Park ground print politics news
शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी १२ अर्ज; १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस

हेही वाचा – Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरात अंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणीची संकल्पना २००३ मध्ये पुढे आली होती. २०१३ मध्ये तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर मत्स्यालय उभारणीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाची नव्याने घोषणा करत ज्युपीटर रुग्णालयाजवळील जागा निश्चित केली. परंतु हा प्रस्तावही कागदावरच राहिला होता. असे असतानाच आता कोलशेत येथील वरचा गाव परिसरात टाऊन पार्कच्या माध्यमातून मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा – Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा

जागेचे आरक्षण बदल

कोलशेत येथील पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेवर टाऊन पार्क अंतर्गत विकसित केले जाणार आहे. या जागेवर सद्यस्थितीत अग्निशमन केंद्रचे आरक्षण आहे. याठिकाणी टाऊन पार्कची उभारणी करायची असेल तर त्याचे आरक्षण बदलावे लागणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने आता जागेवरील अग्निशमन केंद्र हे आरक्षण रद्द करून ती जागा टाऊन पार्कसाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पालिका प्रशासनाने या आरक्षण फेरबदलासंदर्भात हरकती, सूचना मागविल्या असून त्यासाठी पालिकेने ३० दिवसांची मुदत दिली आहे. नागरिकांकडून हरकती आणि सूचना प्राप्त होताच त्यावर सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.