कल्याण : शिळफाटा रस्त्यावरील पलावा भागातील उड्डाण पुलाची मार्गिका, ऐरोली-काटई उन्नत मार्गांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. या रस्त्यांवरील बहुतांशी कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील काही मार्गिका वाहतुकीसाठी नवीन वर्षातील जानेवारी, फेब्रुवारी मध्ये उपलब्ध होणार आहेत. नवीन वर्षापासून कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबई, मुंबई, ठाणेकडील प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी भिवंडी, शिळफाटा, कल्याण, मुंब्रा भागात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या पाहणीनंतर दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडी येथील रांजणोली भागातून सोमवारी सकाळी खासदार शिंदे यांनी विकास प्रकल्पांचा पाहणी दौरा सुरू केला. येत्या वर्षात शिळफाटा, महापे, मुंब्रा-ठाणे, पनवेलकडील प्रवास वाहतूक कोंडी मुक्त झाला पाहिजे. त्यासाठी या भागात सुरू असलेल्या प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला हवेत. यामुळे खासदार शिंदे यांनी शिळफाटा रस्त्यावरील उड्डाण पुलाची पाहणी केली. या पुलाच्या तीन मार्गिका १५ जानेवारीपर्यंत वाहतूकीसाठी खुल्या होतील. त्यामुळे आता सुरू असलेल्या अरूंद पुलावरील कोंडीमय वाहतुक प्रवासाला पूर्णविराम मिळणार आहे. शिळफाटा रस्त्यावरून मुंबई, नवी मुंबई परिसर जोडणाऱ्या ऐरोली-काटई उन्नत मार्गावरील डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू होईल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाण्याच्या उपवन तलावात थीमवर आधारित कांरजाचा लेझर शो; राम मंदीर, श्री स्थानक, मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या थीमचा समावेश

हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारत नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे, अधिकृत होण्यापूर्वीच माफियांकडून घरांची विक्री

मुंब्रा वाय जंक्शन येथे उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. या भागात ऐरोली उन्नत मार्ग, शिळफाटा उड्डाण पुलांचे प्रस्ताव आहेत. या जोड कामांजवळ महापे रस्त्यावर उड्डाण पूल उभारून नेहमीच कोंडीच्या विळख्यात असलेला हा परिसर कोंडी मुक्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिळफाटा-महापे पाईप रस्त्यावर जलवाहिनी कामासाठी एक मार्गिका बंद केली आहे. त्यामुळे कोंडी होत आहे. ही कामे तात्काळ करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या भागात लवकरच उड्डाण पुलाचे काम सुरू केले जाणार आहे. ऐरोली-काटई उन्नत मार्गामुळे नवी मुंबईचे अंतर शिळफाटा येथून ४५ मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. या मार्गाची लांंबी १२ किलोमीटर आहे. या मार्गातील बोगदा १.६८ किमी लांबीचा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp dr shrikant shinde take review of infra projects like ranjnoli shilphata airoli katai elevated bridge asj