ज्या दिवशीही बोट बुडेल त्यादिवशी पहिला पळणारा उंदीर तो असेल माझे तोंड बंद आहे ते बंद राहू द्या, उगाच ते उघडायला लावू नका अशी थेट टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे नरेश मस्के यांच्यावर खासदार राजन विचारे यांनी केली. या टिकेमुळे ठाण्यातील ठाकरे आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेले आहेत.
एकनाथ शिंदे हे मुख्य मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मोठा सुरंग लागला आहे. असे असले तरी ठाण्याचे खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा थेट उल्लेख उंदीर असा केलेला आहे. नरेश म्हस्के यांच्या विषयी प्रश्न विचारला असता, ज्या दिवशी ही बोट बुडेल त्यादिवशी पळणारा पहिला उंदीर तो असेल. आता तो जिथे राहिला आहे तो केवळ माझ्यामुळे राहिला आहे असेही राजन विचारे म्हणाले. या वक्तव्यामुळे नरेश मस्के हे नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जाणार होते अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. ज्या दिवशी मी तोंड उघडेल त्या दिवशी सर्वांना भारी पडेल. मला तोंड उघडायला लावू नका इशाराही त्यांनी नरेश मस्के यांना दिला.