ठाणे : एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते. त्यांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजवून सांगितल्या होत्या. मोदी-शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत. पण, शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे. त्यामुळे माणूस काय करणार? असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचे ते स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला असा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आज, रविवारपासून ठाण्यात सुरू झाला आहे. या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला होता. संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली. मोहीमेची पहिली स्वारी ठाण्यावर केली आहे. टेंभीनाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तिथेच समोर आनंद आश्रम होता, पण आता ते आनंद आश्रम नाही. काही लोक तेथून बाहेर आले. त्यात महिला जास्त होत्या. कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय आहे. आमच्या विरोधात घोषणा करता. आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का? अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली.

आज तुम्ही निवडणूका जिंकला आहात. पण ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे. आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातून झाली होती. आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहीला जाणार आहे असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती. त्यांचे ते स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडला असा आरोपही त्यांनी केला. दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणतात. परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो अशी टीका देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आता लढाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची सुरवात नगरपालिकेपासून झाली होती. आता नगरपालिकेपासूनच आपण विजयाला सुरूवात करणार आहोत असेही राऊत म्हणाले. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अंबादान दानवे, राजन विचारे, सूनिल प्रभू, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.