भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसांचा दौरा केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा १४ फेब्रुवारी रोजी अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा मतदारसंघात येत आहेत. या मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे का? शिवाय कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं काय होणार? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आता खुद्द श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार
माध्यमांशी बोलत असताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मागच्या वेळेस आले तेव्हा मी स्वतः त्यांचे स्वागत केले होते. माझ्या घरी देखील ते आले होते. येत्या १४ तारखेला ते पुन्हा कल्याणमध्ये येत आहेत. या मतदारसंघाचा खासदार म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मजबूत व्हावा, असे वाटत असते. त्याप्रमाणे पक्ष पावले टाकत असतो. तसेच भाजपाचे लोक काम करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये दुसरा अर्थ काढणे योग्य नाही. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात समन्वय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने कारभार करत आहेत. राज्याचा गाडा हाकत आहेत. विकास कामे होत आहेत. मागच्या सहा महिन्यात तीन वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन गेले. नागपूरमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. आगामी काळात हे डबल इंजिनचे सरकार एकत्र राहून आणखी मजबुतीने काम करत राहिल.”
उद्धव ठाकरेंच्या आव्हानालाही दिले उत्तर
हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे. त्यावर देखील श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “निवडणुका लागायच्या तेव्हा लागतील. देशात आणि राज्यात निवडणूक आयोग आहे. आयोगच निवडणुका घोषित करत असतो. सर्वोच्च न्यायालयात विषय प्रलंबित आहेत. मनपामधील आरक्षण, प्रभाग फेररचना बाकी आहे. अशा परिस्थितीत निवडणूक घ्या, निवडणूक घ्या, बोलणं योग्य नाही. आम्हीही निवडणुकीची प्रतिक्षा करत आहोत, निवडणूक जाहीर तर होऊद्या.”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
“१४ फेब्रुवारी रोजी अनुराग ठाकूर यांचा सकाळपासून दौरा सुरू होणार आहे. कळवा, मुंब्रा भागातून सकाळी नऊ वाजल्यापासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पक्षाअंतर्गत संघटनात्मक बैठका आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासह सर्व सहा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीपर्यंत अनुराग ठाकूर दोन ते तीन दौरे करणार आहेत,” अशी माहिती भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली.
“भाजपाने महाराष्ट्रातील जे १८ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत. ते मतदारसंघ अधिक सक्षम करणं आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं, हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रात भाजपा मजबूत आहेच. पण लोकसभेत अधिक यश मिळावं, त्याअनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने लोकसभा मतदारसंघ बळकट करण्याचं काम आम्ही करत आहोत,” अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी दिली.