ठाणे : वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या अधिसूचनेमुळे प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची मात्र खापर आमच्यावर हे योग्य नाही. हे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांनी काढलेल्या अधिसूचने विषयी नाराजी व्यक्त केली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या लुईस वाडी भागात पोलीस बंदोबस्त वाढवला शिवाय या भागातील रस्ताही बंद करण्याची अधिसूचना काढली. या अधिसूचनेत मराठा आंदोलनाचा अथवा यासंबंधीच्या बंदोबस्ताचा कोणताही उल्लेख नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा येण्या जाण्याचा रस्ता असल्याने अधिसूचना काढली जात असल्याचे यामध्ये म्हटले होते. सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आमचे येणे जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडवण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय आहे. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चित योग्य नाही अशी भूमिका खासदार शिंदे यांनी रात्री प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. पोलिसांच्या या पत्रक पाहिजे मुळे आमच्या कुटुंबीयांना जो मनस्ताप सहन करावा लागला याची कल्पना पत्र काढणाऱ्या अधिकाऱ्यांना नसावी. परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे पत्र काढणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण समज द्यावी आणि रस्ता पूर्वीप्रमाणे खुला करण्यात यावा असे पत्र खासदार शिंदे यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Story img Loader