ठाणे : वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या अधिसूचनेमुळे प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची मात्र खापर आमच्यावर हे योग्य नाही. हे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांनी काढलेल्या अधिसूचने विषयी नाराजी व्यक्त केली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या लुईस वाडी भागात पोलीस बंदोबस्त वाढवला शिवाय या भागातील रस्ताही बंद करण्याची अधिसूचना काढली. या अधिसूचनेत मराठा आंदोलनाचा अथवा यासंबंधीच्या बंदोबस्ताचा कोणताही उल्लेख नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा येण्या जाण्याचा रस्ता असल्याने अधिसूचना काढली जात असल्याचे यामध्ये म्हटले होते. सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा