सरकार काम करण्यासाठी समोरच्याला एकतर प्रलोभन दाखवते नाहीतर दडपशाही करत आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार याच पद्धतीने काम करत आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली आहे. तसेच राज्यात सध्या अंधश्रद्धेबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रात आणि सत्तेत असलेल्यानी कठोर पाऊले उचलायला हवी असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
ठाणे येथील एका कार्यक्रमात त्यांनी शनिवारी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केले आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र; म्हणाले, “लोकांपर्यंत जाऊन…”
मूल व्हावे आणि आर्थिक सुबत्ता यावी यासाठी पुणे येथील एका उच्चशिक्षित पाहिलेल्या सासरच्या व्यक्तींनी अघोरी वागणूक दिल्याच्या प्रकार नुकताच समोर आला होता. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की अंधश्रद्धेच्या विरोधात नरेंद्र दाभोळकर यांनी मोठे कार्य केले आहे मात्र त्यांची हत्या झाली. राज्यात अंधश्रद्धेबाबत सुरु असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रात आणि सत्तेत असलेल्यानी तसेच पोलीस यंत्रणेने कठोर पाऊले उचलायला हवी. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. यामुळे महाराष्ट्रातील हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवे. असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. तसेच सध्याचे ईडीचे सरकार म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र सरकार, हे देवेंद्र फडणवीसच बोलले आहे. त्यामुळे मी देखील सरकारचा याच नावाने उल्लेख करत असते. तर सरकार काम करण्यासाठी समोरच्याला एकतर प्रलोभन दाखवतात नाहीतर दडपशाही करतात. गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार याच पद्धतीने काम करत आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी का मोडल्या जात आहेत – खा. सुप्रिया सुळे
माणूस आयुष्यात मुदत ठेवी त्यांच्या अडचणीच्या काळात मोडतो. केंद्र शासन दरवेळी म्हणत असते कि त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. मग अशी काय अडचण आली आहे की मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी(फिक्स्ड डिपॉजिट) केंद्र सरकारला मोडाव्या लागत आहे. केंद्र सरकारकडे देशाची जबाबदारी आहे. मात्र केंद्र सरकारला मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी मोडाव्या लागण ही अतिशय चिंताजनकी आणि गोष्ट आहे. असे मत सुप्रिया सुळे यावेळी व्यक्त केले.