‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधील सहभागी दुकानांमध्ये उपस्थिती

ठाणे : ‘रिजन्सी ग्रूप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ सध्या उत्साहात सुरू आहे. महोत्सवाअंतर्गत ठाणेकरांना त्यांच्या लाडक्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळत आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांना चित्रपटातील कलाकार भेट देत आहेत. या दुकानांना बुधवारी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी भेट देणार आहेत.

मृणाल कुलकर्णी यांनी विविध मराठी आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. बुधवारी सायंकाळी ६.३० पासून मृणाल सरलाज स्पा अँड सलोन (दोस्ती इम्पेरिया), कलानिधी (नौपाडा), माहेश्वरी फर्निचर (मानपाडा), ईशा टुर्स (बी केबीन) आणि लँडमार्क मर्सिडीज (घोडबंदर रोड) या दुकानांना भेट देणार आहेत.

येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सुरूअसणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची किंवा चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर आणि रेफ्रिजरेटर अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्याला कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येतील.

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे.  वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डिजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजीटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, क्रिष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटीनम पार्टनर आहेत. तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हिलींग पार्टनर आहेत. त्याचबरोबर ईशा टुर्स हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

’ लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसे जिंकता येणार आहेत.

’ सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून एक कूपन दिले जाईल.

’ कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

’ अर्धवट माहिती भरलेली कूपन स्वीकारली जाणार नाहीत.

’ ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

’ नियम आणि अटी लागू असतील.

Story img Loader