ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मार्गावरील कशे‌ळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचल्याने अपघातांची भीती व्यक्त होत होती. याच मुद्द्यावरून टीका होऊ लागताच संबधित विभागाने पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले आहे. यामुळे खाडीपूल राडारोडामुक्त झाल्संबधित विभागाने पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले आहे. यामुळे खाडीपूल राडारोडामुक्त झाल्याचे दिसून येत असले तरी यापूर्वी रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे धूळ प्रदूषण कायम असल्याचे दिसून येते.

हेही वाचा >>>ठाणे: अपघातात तरुणाचा मृत्यू

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

ठाणे आणि भिवंडी शहराच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील ग्रामपंचायतींच्या अख्यारीत येणारे अंतर्गत रस्ते काँक्रीटचे असून हे रस्ते सुस्थितीत असल्याचे दिसून येते. या भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजुरफाटा या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अवजड वाहनांसह इतर वाहनांची सतत वर्दळ सुरु असलेल्या या मार्गावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. काही ठिकाणी डांबराच्या साह्यायने खड्डे भरणीची कामे करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अद्यापही खड्डे भरलेले नाहीत. खराब रस्त्यामुळे धुळीचे प्रदुषण वाढले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, या मार्गावरील कशेळी खाडी पुलावर माती आणि रेतीचे ढिगारे साचले आहेत. या ढिगाऱ्यांमधील माती व रेती रस्त्यावर इतरत्र पसरून त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त होत होती. या मुद्दयावरून टीका होऊ लागताच संबंधित विभागाने पुलावरील माती आणि रेतीचे ढिगारे जेसीबीच्या साहय्याने बाजूला करण्याचे काम काही दिवसांपुर्वी सुरु केले होते. मात्र, काही ठिकाणचे माती आणि रेतीचे ढिगारे हटविण्यात आलेले असले तरी काही ठिकाणी हे ढिगारे ‘जैसे थे’च होते. तसेच ढिगारे उचलण्याचे कामही बंद झाल्याने पुलांवर अपघातांची भीती कायम होती. या संदर्भात लोकसत्ता ठाणे या सहदैनिकात वृत्त प्रसारित होताच संबधित विभागाने पूलावरील मातीचे ढिगारे उचलेले आहे. यामुळे खाडीपूल राडारोडामुक्त झाला आहे.