ठाणे : समाज माध्यमांवरून ‘ मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ‘ अशा योजनेच्या नावाने काही संदेश प्रसारित होत आहेत. यामध्ये १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालकाचा मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील २ बालकांना बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत अशा आशयाचा मजकूर यातून प्रसारित करण्यात येत असून ही केवळ अफवा असल्याचे ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.याला कोणत्याही नागरिकांना बळी पडू नये असेही विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्याता आला. यामध्ये अनेक विकास कामे आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र यानंतर समाज माध्यमांवर राज्यात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबविण्यात येत असल्याचे संदेश प्रसारित होऊ लागेल. त्यामध्ये १ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील २ मुलांस बाल सेवा योजना अंतर्गत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत असे प्रसारित करण्यात येत आहे. महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून ही अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत सावधानता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्ट वर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही अफवा आहे. अनाथ अथवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

संतोष भोसले (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे)

Story img Loader