‘सिमी’ या बंदी घातलेल्या संघटनेचा एक म्होरक्या आणि मुंबईत २००२ आणि २००३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेला साकीब नाचण याची बुधवारी ठाणे मध्यवर्ती तुरुंगातून सुटका झाली. टाडा न्यायालयाने गेल्या वर्षी त्याला या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र खटल्यादरम्यान गेली दहा वर्षे तो तुरुंगातच असल्याने त्याची सुटका करण्यात आली.
मुंबईतील विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई सेंट्रल येथे हे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांप्रकरणी पोलिसांनी नाचण याच्यासह काहीजणांना अटक केली होती. तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहातच होता. मुंबई विशेष टाडा न्यायालयात गेल्यावर्षी या बॉम्बस्फोट खटल्याची अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने नाचणला दोषी ठरवून दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झाल्यापासून ते आतापर्यंत असा त्याचा दहा वर्षांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आला होता. सुटकेनंतर कुटुंबियांसोबत तो वाहनाने पडघ्यातील बोरिवली येथील घरी निघाला. दुपारी बारा वाजता तो गावी पोहोचला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मृत्यूपूर्वी हज यात्रा करणार असल्याचे त्याने पत्रकारांना सांगितले. तसेच या पुढील आयुष्य कुटुंबीयांसोबत जगणार आहोत आणि जमीन खरेदी-विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय करणार आहोत, असेही त्याने सांगितले.
शिक्षेत सूट
साकीब नाचणला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तुरुंगात नाचण याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने त्याची पाच महिने १३ दिवस आधीच सुटका केली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी ही माहिती दिली.
साकीब आणि पडघा-बोरिवलीतील दहशत!
मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडीजवळील पडघा-बोरिवली ही गावे महाराष्ट्र पोलिसांच्या नोंदी कायम अतिसंवेदनशील म्हणून प्रसिद्ध. पोलिसांवर हल्ले किंवा एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खाकी वर्दीवरील नावाची पाटी काढण्यापर्यंत या गावातील तरुणांची मजल गेली होती. मोहमद साकीब नाचण हा या गावातील तरुणांचा आदर्श. नाचण आणि त्याच्या कुटुंबियांची या गावात प्रचंड दहशत आहे. दहशतवादी कारवाया आणि बॉम्बस्फोट या दोन खटल्यांमध्ये शिक्षा भोगलेला नाचण तुरुंगाबाहेर आल्याने ठाणे पोलिसांना त्याच्या कारवायांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.
पडघा-बोरिवली हे नाचणचे गाव. त्याचे काका या भागातून जिल्हा परिषदेवर निवडून येत आणि त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले होते. बंदी घालण्यात आलेल्या ‘सीमी’ या संस्थेचा साकिब नाचण हा कार्यकर्ता होता. १९८०च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. त्याच वेळी जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली. देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिस इंटेलिजन्सने मुस्लीम तरुणांना हाताशी धरले. त्यात साकिब नाचण होता. पडघा-बोरिवली भागातील तरुणांना त्याने मदतीला घेतल्याचा आरोप झाला होता.
१९९०च्या दशकात बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर तेव्हा नाचणला अटक झाली होती. गुजरातमधील ‘टाडा’ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली.
पडघा-बोरिवलीमध्ये परतल्यावर त्याने पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू केल्या. त्याच्याच देखरेखेखाली नाशिक महामार्गावरून जाताना पडघा गावाच्या टोकाला दिसणाऱ्या डोंगरावर त्याने तरुणांना शस्त्रात्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. नाचणची एवढी दहशत होती की गावात जाण्यास पोलीसही धजावत नसत.१९९८च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस निरीक्षकाची खाकी वर्दीवरील नावाची पाटी फाडण्यात आली होती. मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यात जामिनावर असताना भिवंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अॅड. मोहन रायचनी यांच्या हत्येतही नाचण याला अटक झाली होती. नाचण हा शांत बसणारा नाही. त्याच्या डोक्यात कायम दहशतवादी कृत्ये किंवा सुडाची भावना असते, असा अनुभव एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने सांगितला.