मुंबईतल्या एका २४ वर्षीय महिलेने तिच्या सहकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. या प्रकरणात १३ जुलै रोजी FIR दाखल करण्यात आला आहे. या महिलेने आरोप केला आहे की ती झोपलेली असताना तिच्या सहकाऱ्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या घटनेच्या एक आठवड्यानंतर FIR दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

मुंबईतल्या एका ऑफिसमधल्या टीमने ६ जुलै या दिवशी कोंडेश्वर, बदलापूर या ठिकाणी पिकनिक आणि ट्रेकला जाण्याचं नियोजन केलं. हे सगळेजण बदलापूर या ठिकाणी पोहचले. त्यानंतर महिलेला झोप लागली, त्यामुळे ती ट्रेकला गेली नाही. नंतर तिला हे समजलं की तिचा एक पुरुष सहकारीही मागे राहिला होता. या महिलेने आता याच सहकाऱ्यावर आरोप केला आहे की त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेच्या एक आठवड्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. The Free Press Journal ने हे वृत्त दिलं आहे.

rape case
खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Arvind Kejriwal
Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला, आपचा भाजपावर गंभीर आरोप
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
Daljeet Kaur
पूर्वाश्रमीच्या पतीवर दलजीत कौरचा आरोप; म्हणाली, “त्याने वर्षभर आमच्या मुलाकडे…”
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल

हे पण वाचा- परिक्षेसाठी दोन अल्पवयीन मुली नागपुरात आल्या; ८० वृद्ध घरमालकाने अश्लील चाळे करून…

मुंबईतही घडली विनयभंगाची घटना

अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणीही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात एका तिकिट बुकिंग क्लार्कवर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव अभिषेक जोशी असं आहे. त्याच्यावर कलम ७९ (महिलेचा अपमान करणं, अश्लील हावभाव आणि कृत्य करणं) कलम ३५१ (२) आणि कलम ३५५ (मद्यधुंद व्यक्तीकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन) या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या तरतुदी ८५ नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला.

Woman Molest By Her Office Colleague
बदलापूरमध्ये पिकनिकला गेलो असताना विनयभंग झाला असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मुंबईत घडलेलं हे प्रकरण काय?

३ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास विक्रोळीहून घाटकोपर या ठिकाणी महिला चालली होती. त्यावेळी तिने तिकिट काऊंटरवर २०० रुपये दिले. त्यावेळी तिकिट बुकिंग क्लार्ककडे सुट्टे पैसे नव्हते त्यामुळे त्याने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर या महिलेने आरोप केला आहे की सदर अभिषेक जोशी यांनी दारुच्या नशेत माझ्याशी गैरवर्तन केलं. हा आरोप झाल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर जोशी यांनी तिकिट बुकिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतलं. स्टेशन मास्तरांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. ज्यानंतर घाटकोपर आणि कुर्ला येथील युनिटचे अधिकारी आले आणि त्यांनी गर्दीला पांगवलं. जोशी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत त्यांनी मद्य प्राशन केल्याची बाब समोर आली.