ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेच्या निर्माण कामाला गती आलेली आहे. समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदा बनविले जात आहे. या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाचवेळी दोन बुलेट ट्रेन २५० च्या गतीने धावू शकतात. तर एक बुलेट ट्रेन धावत असेल तर तिचा वेग ३२० इतका असू शकतो. तशा पद्धतीने या भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्यास्थळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेन मार्गिकेच्या निर्माण कामाचा आढाव घेतला. तसेच पत्रकारांना माहिती दिली. वैष्णव म्हणाले की, हा प्रकल्प अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात सुरक्षा, विद्युतीकरण, हवा खेळती राहील अशी व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदाच बनविले जात आहे. या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाचवेळी दोन बुलेट ट्रेन २५० च्या गतीने धावू शकतात. तर एक बुलेट ट्रेन धावत असेल तर तिचा वेग ३२० इतका असू शकतो. तशा पद्धतीने या भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली आहे. असे वैष्णव म्हणाले.

हेही वाचा…डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम

भुयारी मार्गिकेच्या ३४० किमीचे काम गतीने सुरू आहे. नदीवरील पूलांचे काम, स्थानकांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहे. बीकेसी स्थानकाचे काम करणे हे अभियांत्रिकीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. येथे जमीनीच्या आतमध्ये १० मजली इमारत असेल. तर जमीनीवर ६० मजली इमारत असेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी परवडणारे जलद वाहतुक विकसित करणार होते. ते स्वप्न या माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

Story img Loader