मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी गॅस टँकरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरचा टायर फुटला. चारोटी- गुलजारी पुलाजवळ ही घटना घडली. टायर फुटल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात टँकरने दुचाकीला धडक दिली होती. यात दुचाकीवरील दोन जण आणि टँकर चालक गंभीर जखमी झाले आहेत.
आणखी वाचा
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक मंदावली आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.