लोकसत्ता खास प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डोंबिवली : डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या सदस्यांनी डोंबिवली जवळील खोणी भागातील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे खरी आहेत असे दाखवून मुंबईतील एक व्यावसायिक आणि त्याच्या मित्राला विक्री केली. या जमीन विक्रीच्या तडजोडीच्या व्यवहातून लोअर परेलमधील एका उच्चभ्रू गृहसंकुलातील सदनिका आपणास स्वस्तात घेऊन देतो असे सांगून रिअल इस्टेटच्या सदस्यांनी दोन जणांची १० कोटी ४० लाख रूपयांची फसवणूक केली आहे.
सन २०२१ ते २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी या फसवणूक प्रकरणी मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारदाराच्या तक्रारीवरून डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या चार सदस्यांसह इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आणखी वाचा-ठाणे : सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन कोटी रुपयांना ऑनलाईन फसवणूक
पोलिसांच्या प्राथमिक तपासणी अहवालात तक्रारदाराने दिलेली माहिती अशी की, ठाकुर्लीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सदस्यांनी डोंबिवली जवळील खोणी येथील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे सन २००७ च्या मुद्रांक शुल्क दस्तऐवजावर तयार करण्यात येऊन, ही कागदपत्रे खूप जुनी असल्याचे मुंबईतील जमीन खरेददारांना दाखविण्यात आले. या जमिनीचा मूळ मालक रिअल इस्टेटमधील एक सदस्य नसताना, ते या जमिनीचे मूळ मालक आहेत असे दस्तऐवजावर दाखविण्यात आले. ही जमीन रिअल इस्टेच्या चार आणि इतर सदस्यांनी मुंबईतील कांदिवली भागातील एक व्यावसायिक आणि त्यांच्या मित्राला विक्री केली. त्याच बरोबर या जमिनीच्या तडजोडीच्या व्यवहारातून या जमिनीबरोबर रिअल इस्टेटच्या सदस्यांनी व्यावसायिकांना आम्ही तुम्हाला लोअर परेल येथील एका उच्चभ्रू वसाहतीच्या गृहसंकुलात स्वस्त दरात सदनिका घेऊन देतो, असे खोटे आश्वासन दिले.
आणखी वाचा-कल्याणमध्ये मुरबाड रोडवर महिलेचे मंगळसूत्र खेचून दुचाकीस्वारांचा पळ
या आश्वासनाच्या माध्यमातून सदनिकेच्या नावे रिअल इस्टेटच्या सदस्यांनी एका व्यावसायिकाकडून सहा कोटी ९० लाख आणि त्यांच्या मित्राकडून तीन कोटी ५० लाख रुपये रिअल इस्टेटचे कार्यालय येथे स्वताच्या उपस्थितीत आणि इतर सदस्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस माध्यमातून भरणा करून घेतली. तक्रारदारांना जेव्हा जमीन व्यवहार आणि सदनिका व्यवहाराच्या माध्यमातून रिअल इस्टेटच्या सदस्यांनी आपली आर्थिक फसवणूक केली आहे हे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक केलेली नाही. साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.