ठाणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून मुंबईतील एका व्यवसायिकाची ५३ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये व्यवसायिकाची कंपनी आहे. त्यांचा रस्ते निर्माण करणे आणि रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एक महिला त्यांच्या कार्यालयात लायझनिंगच्या कामासाठी आली होती. व्यवसायिकाला १०० कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. त्यामुळे महिलेने जमिनीच्या नावाने कर्ज काढून देणाऱ्या व्यक्तीची ओळख व्यवसायिकाच्या कर्मचाऱ्यांसोबत करून दिली होती.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा..Kalyan Hoarding: कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून अपघात, दोन जण जखमी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

व्यवसायिकाची रायगडमध्ये १०० एकर जमीन आहे. या जमिनीवर कर्ज मिळू शकेल असे त्या व्यक्तीने सांगितले. कर्ज काढून देणाऱ्या व्यक्तीने कर्ज काढण्याच्या प्रक्रियेसाठी ४८ लाख रुपये आणि पाच लाख रुपये वकिलांचे शुल्क असे ५३ लाख रुपये मागितले. त्यानुसार त्यांनी टप्प्याटप्प्याने ५३ लाख रुपये पाठविले. परंतु दोन वर्ष उलटूनही त्यांना कर्ज मंजूर झाले नव्हते. त्यामुळे व्यवसायिकाच्या कर्मचाऱ्याने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कर्मचाऱ्याने ज्या बँकेतून कर्ज प्राप्त होणार होते. त्या बँकेत विचारले असता, कोणतीही माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader