दादरमधील (पश्चिम) छबीलदास शाळेत मोठा स्फोट झाला आहे. या ठिकाणी चार सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.आज पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणी आग लागली होती. तर यामध्ये तीन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या भीषण स्फोटामुळे शाळेचा दुसरा मजला उध्वस्त झाला आहे आणि भिंतींनाही तडे गेले आहेत. याशिवाय काचांचे तुकडे परिसरात विखुरलेले आहेत.

या घटनेमधील जखमींवर सायन रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. तर सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण पोलीस व अग्निशमन विभागाकडून शोधले जात आहे.

घटेनेची माहिती मिळतात अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू झाले. जवळपास अर्धातासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai four cylinders explode in dadars chabildas school msr