ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारित भाग असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी सल्लागार नियुक्तीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यानंतरच्या सात दिवसात कल्याण-मेट्रो मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवली पालिकेतील २८ नगरसेवकांचा अनधिकृत घरात निवास

goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
1 thousand 201 complaints received on C Vigil App within a month for violation of code of conduct
आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

सल्लागार नेमण्याच्या कामासाठी ११ कोटी २८ लाखाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली. कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग २० किलोमीटरचा आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, शिळफाटा समांतर रस्ता, काटई ते खोणी तळोजा असा या मेट्रोचा मार्ग असणार आहे. एकूण १७ स्थानके या मार्गात आहेत. या मार्गामुळे भिवंडी, कल्याण परिसर थेट नवी मुंबई, पनवेल, तळोजा परिसराला जोडला जाणार आहे. आतापासून शहरी भागाजवळ असुनही विकासापासून वंचित असलेला कल्याण तालुक्यातील २७ गाव, अंबरनाथ, नवी मुंबईतील गावे विकासाच्या प्रवाहात येणार आहेत, असे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा- डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठाकडील रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी बंद

कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग ठाणे-भिवंडी-मेट्रो मार्गाच्या वेळीच पूर्ण झाला पाहिजे, यासाठी कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे खूप आग्रही आहेत. यासाठी त्यांनी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या वेळोवेळी भेटी घेतल्या आहेत. या सततच्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण तळोजा मेट्रो मार्गासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. अलीकडेच या मार्गाचे सर्व्हेक्षण एमएमआरडीएच्या मेट्रो विभागाकडून पूर्ण करण्यात आले होते.

हेही वाचा- “मुख्यमंत्र्यांना वाटते अख्खे ठाणे त्यांच्या हातात असावे, पवारांनी एवढे वर्ष राजकारण केले, पण..” जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना टोला

शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, सिमेंटीकरण पूर्ण होत आल्यामुळे या रस्त्यावरुन दुमजली बस सुरू करण्यासाठी खा. शिंदे प्रयत्नशील आहेत. कल्याण, डोंबिवली शहरे वाहन कोंडी मुक्त झाली पाहिजेत. या भागात दळणवळणाच्या गतिमान सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यादृष्टीने खा. शिंदे यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. डोंबिवली, कल्याण भागात खा. शिंदे यांच्या प्रयत्नातून एक हजार कोटीची रस्ते कामे सुरू झाली आहेत. ही कामे विनाथांबा आपल्या पक्षीय कार्यकर्त्यांचे काही एक न ऐकता, रस्ते कामात बेकायदा बांधकाम आले तर त्यात हस्तक्षेप न करता ते रस्ते काम झटपट पूर्ण होईल यादृष्टीने खा. शिंदे यांनी प्रयत्न करावेत. स्थानिक पातळीवर काही पक्षीय कार्यकर्ते रस्ते बांधकामात अडथळा आणतात. त्यांचा बंदोबस्त खासदारांनी करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.