Mumbai Nashik Accident Update: मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा अत्यंत भीषण आणि विचित्र म्हणता येईल असा अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ पहाटे तीनच्या सुमारास अपघात झाला. माल वाहतूक ट्रकला, बस व मागील एकूण चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल‌ झालेत.

समोर आलेल्या माहितीनुसार गोठेघर या ठिकाणी हा अपघात झाला. या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मालवाहतूक ट्रकलाच पाठीमागून येणाऱ्या वाहनांनी धडक दिल्याने हा अपघात झाला. या ठिकाणी बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं. अपघातात पाचही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai nashik highway accident near shahapur five vehicles three killed on the spot scj