ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. आसनगाव ते माजिवडा या केवळ दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास लागत आहेत. याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची नाशिक, शहापूर, कल्याण, भिवंडीतून मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक होते. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी कल्याण-भिवंडी भागात राहणारे हजारो नोकरदार हलकी वाहने, दुचाकीवरून आपापल्या कचेऱ्यांमध्ये जातात. असे असताना हा महामार्ग पुरेसा रुंद नाही. पावसाळ्यात दरवर्षी महामार्गाची चाळण होत असते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पहिल्याच पावसात ग्रामीण भागातील रस्त्यासारखी या महामार्गाची अवस्था झाली आहे.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
pm narendra modi rally
नाशिक: पंतप्रधानांच्या सभेमुळे ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध, सभेला येणाऱ्या वाहनांसाठी तळ निश्चित

खारेगाव खाडी पुलाचा भाग, दिवे अंजुर, माणकोली, वासिंद, आसनगाव भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी डबक्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत. दिवे अंजुर भागात दुभाजकामध्ये पाणी (पान ८ वर)(पान १ वरून) साचून तळे झाले आहे. अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची यंत्रणा अपुरी पडत आहे. महामार्गावर ठाणे येथील माजिवडा ते वडपे रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. वडपेच्या पुढील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या यंत्रणांविरोधात चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. एक्स, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महामार्गावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. कोंडीमुळे कायम उशीर होतो, अशी तक्रार रोहन कांबळे या प्रवाशाने नोंदविली. खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वाहतूक कोंडीचा जाच

● रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेच्या वाहनांचा खोळंबा.

● बसमधून प्रवास करताना महिला, वृद्ध, मुलांचे अतोनात हाल.

● दुचाकी, चारचाकी खड्ड्यांमध्ये आदळल्याने नुकसान

● इंधनाचा प्रचंड अपव्यय.

पाऊस उघडताच आम्ही खड्डे बुजविण्यास सुरुवात करतो. खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप पाटीलतांत्रिक प्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

छाया : सचिन देशमाने