मुंबईतील दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबतच्या सहप्रवाशाला करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोकनाका येथे मुंबई पोलिसांकडून चालकांना अडविले जात आहे. अनेकांना आजपासून कारवाई होणार असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे सहप्रवाशांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. पहिला दिवस असल्याने पोलिसांकडून प्रवाशांना हेल्मेट परिधान करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या निर्णयावर चालकांकडून तीव्र नाराजी उमटत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हेल्मेटसक्तीबाबतच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं होतं. विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहन कायद्यानुसार ५०० रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Maharashtra Breaking News Live: राज्यसभेची निवडणूक ते औरंगाबादसभेवरुन आरोप प्रत्यारोप;  क्षणोक्षणीच्या अपडेट्स एकाच क्लिकवर

नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुचाकीस्वारांना आणि सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्यात येण्याचे पत्रक वाहतूक मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी २५ मे रोजी काढले होते. १५ दिवसांनंतर कारवाई सुरू होणार असल्याचे त्या वेळी म्हटले होते. तसेच विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवासी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आणि तीन महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police taking strict action against helmetless pillion riders sgy