ठाणे : आमच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. मला पूर्वीपासून ईव्हीएमबाबत शासंकता होती आताही शासंकता आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. विजयी झाल्यानंतर त्यांनी ईव्हीएम यंत्राबाबत वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा मतदार संघात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे नजीब मुल्ला निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुमारे एक लाख मतांनी विजय मिळविला आहे. जितेंद्र आव्हाड यांना १ लाख ५७ हजार १४१ तर मुल्ला यांना ६० हजार ९१३ इतकी मते मिळाली आहे. जितेंद्र आ‌व्हाड यांनी विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. आम्हाला ईव्हीएम यंत्राबाबत पूर्वी देखील साशंकता होती आणि आताही आहे. कळवा मुंब्रा क्षेत्राचा विकास केल्याने मला निवडून देण्यात आले असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra constituency jitendra awhad statement regarding evm amy