Mumbra Kalwa Vidhan Sabha Election 2024 : ठाणे महागनरपालिका क्षेत्रात असलेला परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडत नसलेला मतदारसंघ म्हणजे कळवा-मुंब्रा मतदारसंघ. २००९ पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात मोडत होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्षे इथे नेतृत्व केलं. परंतु, २००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने कळवा मुंब्रा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. परंतु, आता राष्ट्रवादीतील फुटीमुळे ही जागा कोणाला मिळतेय हे पाहावं लागेल.

संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. भूमिपूत्र आगरी-कोळी बांधव आणि मुस्लीम समाज असे मिश्र मतदार येथे राहतात. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत जितेंद्र आव्हाडांनी येथे खूप कामं केली आहेत. म्हणून मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली तर जितेंद्र आव्हाडांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Zakia Jafri passes away news in marathi
व्यक्तिवेध : झाकिया जाफरी
himachal Pradesh balmaifil article
बालमैफल : अद्भुत निसर्ग
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Controversy arose after Dahanu Deputy Registrar registered deposit agreement for BJP office bearers land purchase
डहाणूत जमीन घोटाळा, भाजपच्या पदाधिका-याकडून वर्ग दोनच्या जमिनीवर साठेकरार व कुलमुखत्यार पत्राची बेकायदा नोंदणी
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Friction between Mahayuti allies intensifies with guardian ministership issue
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?

हेही वाचा >> Ovala Majiwada Sabha Constituency : उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार?

नजीब मुल्लांनी केलं होतं सूचक विधान

तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून मुस्लीम उमेदवार उभा करून अजित पवार गटाकडून कळवा मुंब्रा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा होती. “गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता विधासभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार आहे. आज आम्ही यासंदर्भात स्पष्ट करत आहोत की, पक्ष जो उमेदवार देईन त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार आहोत”, असं नजिब मुल्ला काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

या मतदारसंघात थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असला तरीही इतर पक्षांचंही आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड १ लाख ९ हजार २८३ मतानी जिंकले होते. तर, शिसेनेच्या दिपाली सय्यद ३३ हजार ६४४ मतांनी आणि आम आदमी पक्षाचे अबू फैजी यांना ३०हजार ५२० मते मिळाली आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, त्यांच्याविरोधात येथील स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे येथे थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे.

आरोप प्रत्यारोपांनी गाजली प्रचारसभा

नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांनी या निवडणुकीच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप केले. खुद्द धनंजय मुंडे यांनी नजीब मुल्ला यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत जितेंद्र आव्हाडांवर अनेक दोषारोप करण्यात आले. या आरोपांवर जितेंद्र आव्हाडांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे जनता आता कोणाच्या बाजूने उभी राहिली आहे हे येत्या २३ नोव्हेंबरलाच कळेल.

ताजी अपडेट

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील मुस्लिम बांधव मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी देतात की पारंपरिक आमदाराला पुन्हा निवडून आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यांत मोडतो. या जिल्ह्यात ५६.५ टक्के मतदान झालं आहे.

नवीन अपडेट

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा बाजी मारली आहे. त्यांना १ लाख ५७ हजार १४१ मते मिळाली असून त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला यांना ६० हजार ९१३ मते मिळाली आहेत.

Story img Loader