ठाणे : मुंब्रा येथे मराठी बोलण्याचा आग्रह धरल्याने एका तरुणाला माफी मागण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर कळवा – मुंब्राचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. लहान मुलांच्या वादाने महाराष्ट्र पेटेल असा रंग देऊ नका असे आव्हाड म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

हेही वाचा – मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच, श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डायघर भागात राहणारा २१ वर्षीय मुलगा गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागातील एका रुग्णालयात बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. रुग्णालयातून खाली उतरल्यानंतर तो फळ विक्रेत्याकडून खरबूज खरेदीसाठी गेला. त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला. त्यामुळे मराठी बोला असे तो तरुण फळ विक्रेत्याला म्हणाला. या कारणावरून फळ विक्रेता आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलाविले. ते सहकारी आल्यानंतर त्यांनी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. तसेच तो माफी मागत असल्याचे चित्रीकरणही प्रसारित केले. या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला. तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार दाखल केली. त्या जमावाने मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर त्यांनी तरुणाविरोधात घोषणाबाजी केली. तर मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमल्याने मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणानंतर आव्हाड यांनीही मत व्यक्त केले. अशा छोट्या लहान मुलांच्या वादाला महाराष्ट्र पेटेल असा रंग देऊ नका. जे घडले ते चुकीचे आहे. दोघांनाही शिक्षा व्हायला हव्यात असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra marathi case jitendra awhad first reaction ssb