मुंब्रा रेतीबंदर येथे खाडी किनारी मोठ्याप्रमाणात राडारोडा टाकून भरणी होत असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केला आहे. भरणी होत असल्याची एक चित्रफीतच त्यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नसेल तर हा घ्या पुरावा असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाच्या ऱ्हास सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा- Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा रेतीबंदर येथे खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात भरणा सुरूच असतो. यासंदर्भात अनेकदा पर्यावरणवादी संघटनांकडून तक्रारी केल्या जातात. परंतु माफियांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह होत असतात. त्यातच आता डम्पर आणि ट्रकमध्ये राडारोडा भरून तो मुंब्रा खाडी किनारी टाकला जात असल्याची एक चित्रफीत कळवा मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे. तसेच ‘शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नसेल तर हा घ्या पुरावा’ असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. कारवाई होईल का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रकारानंतर ठाणे जिल्ह्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरूच असल्याचे समोर येत आहे.