महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थित राहत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. परंतु मंगळवारपासून आयुक्त बांगर हे सुट्टीवर जाताच पालिका मुख्यालयात अनेक अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पालिका मुख्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेचे अनेक अधिकारी- कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नव्हते. अनेक अधिकारी-कर्मचारी नेमूण दिलेल्या कामाच्या ठिकाणी जात नसल्याचे चित्र होते. त्याचा फटका पालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसत होता. ही बाब महापालिकेच्या आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे त्यांनी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला होता. कार्यालयीन वेळेत आणि नेमूण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहत नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरहजरी लावण्यास सुरुवात केली होती. तसेच उशीरा येऊन हजेरी वहीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी करू नये म्हणून कार्यालयीन वेळेनंतर काही मिनीटांनी हजेरी नोंद वही विभाग प्रमुखांकडून ताब्यात घेतली जात आहे. यानंतरही सातत्याने उशीरा येणाऱ्या ३५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या. या कारवाईनंतर अनेक अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी हातातले खंजीर बाजूला ठेवावेत’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले “वसा, वारसा…”

आयुक्त बांगर हे स्वत: दररोज पालिका मुख्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विविध भागात दौरे करण्याबरोबरच आढावा बैठका घेत आहेत. अधिकारी-कर्मचारी उपस्थित असल्यामुळे नागरिकही कामानिमित्त सकाळपासूनच येत असून यामुळे पालिका मुख्यालय सकाळपासूनच गजबजलेले असल्याचे दिसून येत होते. परंतु मंगळवारपासून आयुक्त बांगर हे सुट्टीवर जाताच पालिका मुख्यालयात अनेक अधिकारी-कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे पालिका मुख्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner abhijit bangar is on vacation officers and employees are also not present thane tmb