ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपखाडी मतदार संघात ठाणे महापालिका आयुक्त  डॉ. विपीन शर्मा हे मंगळवारी सकाळी पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकासकामांबरोबरच वाढीव पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवर करण्यात आलेल्या जोडणीची पाहणी करून कामाचा आढावा घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आनंदनगर चेक नाका येथून सकाळी ११.१५ वाजता या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. कोपरी आनंदनगर – सर्व्हिस रोड धर्मवीर मार्ग – किसननगर भटवाडी-किसननगर पश्चिम- किसन नगर पूर्व असा दौऱ्याचा मार्ग आहे. हे सर्व परिसर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपखाडी मतदार संघात येतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात पालिका आयुक्तांचा आज दौरा करणार असल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यानंतर ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने मुंबई महापालिकेच्या जलवाहीनीवरून कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर इतके पाणी देण्यासाठी जलवाहीनी जोडणीची कामे हाती घेतली असून याच कामांबरोबर रस्ते, स्वच्छता तसेच इतर कामांचा पाहणी दौरा करणार आहेत.