कल्याण: आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुसंडी मारण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर युती केल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली. दलित पँथर चळवळीच्या ५० वर्षाच्या वाटचालीवर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी मंत्री आठवले आचार्य अत्रे रंगमंदिरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री आठवले यांनी अभिनेत्री जुही चावला हिने केलेल्या ट्वीटवर निशाणा साधत तिचाही समाचार घेतला. मुंबईच्या हवेत दुर्गंधी येत असल्याचे ट्वीट जुही चावला हिने केले होते. याविषयी बोलताना मंत्री आठवले यांनी असे वाटत असेल तर जुही चावला हिने मुंबई सोडून निघून जावे असा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त; रस्ते, पदपथ मोकळे असल्याने पादचाऱ्यांकडून समाधान

आगामी पालिका निवडणुकीत भाजप मनसे बरोबर युती करण्याचे वारे आहेत याविषयी आठवले म्हणाले, राज ठाकरे यांना माझा व्यक्तिशा विरोध नाही मात्र त्यांच्या भोंगा, उत्तर भारतीय विरोध अशा काही विषयांना माझा विरोध आहे. भाजपचे हिंदी भाषक राज्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही ठिकाणी त्यांची राज्ये आहेत. अशा परिस्थितीत मनसे बरोबर युती केल्यास भाजपला त्याची किंमत चुकवावी लागेल आणि भाजपच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत कोपर येथे ‘विठाई हेरिटेज’ बेकायदा इमारत; इमारत बेकायदा असल्याची नगररचना अधिकाऱ्यांची माहिती

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील महापालिकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि रिपाई आठवले गट एकत्र युती करुन लढणार असल्याने या युतीमध्ये मनसेची गरज नाही, असे ते म्हणाले. प्रा. विठ्ठल शिंदे लिखित दलित पँथर क्रांतिकारी नोंदी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मंत्री आठवले यांनी पँथर चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईतील अनेक भागात झोपड्यांचा विषय प्रलंबित आहे. याविषयी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. हा विषय मार्गी लागेल असे प्रयत्न होतील. मुंबईत अमिताभ बच्चन सारखे महानायक राहतात. त्यामुळे जुहीच्या मताशी मी असहमत आहे, असे ते म्हणाले. जुही चावला हिला दुर्गंधीचा त्रास होत असेल तर तिने मुंबईतून निघून जावे, असे ते म्हणाले.