डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरात ६५ बेकायदा इमारती उभारणारे बहुतांशी भूमाफिया, त्यांचे साथीदार आता या बेकायदा इमारतीवर न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता विचारात घेऊन अनेक बेकायदा बांधकामांचे भूमाफिया आपल्या साथीदारांसह देशाच्या विविध भागातील प्रसिध्द तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याच्या निमित्ताने पर्यटनासाठी निघून गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती बांधतांना त्या बेकायदा आहेत. या इमारती उभारत असलेल्या जमिनी सरकारी, पालिकेच्या आरक्षित भूखंडांच्या आहेत हे माहिती असल्याने अनेक भूमाफियांनी या बेकायदा इमारती उभारताना या इमारतींचे कागदोपत्री आपले सर्व व्यवहार आपल्या वाहनाचा चालक, घरगडी, इमारत बांधकामांवरील मुकादम, खास समर्थक यांच्या नावाने केले. प्रत्यक्ष बेकायदा इमारतीमधील घरे विक्री करताना भूमाफियांनी स्वता उभे राहून नागरिकांबरोबर व्यवहार केले आहेत. घर खरेदी करणारे सर्व नागरिक या भूमाफियांना चांगले ओळखतात.

आता इमारतींवर पालिकेकडून कारवाई होण्याची वेळ आली तेव्हा अनेक बेकायदा इमारतींचे बांधकामधारक भूमाफिया नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, या भीतीने नागरिकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पालिका अधिकारी ६५ महारेरा बेकायदा इमारतींच्या ठिकाणी जात आहेत. तेथे अधिकाऱ्यांना त्या इमारतीचा विकासक, वास्तुविशारद किंवा जमीन मालक कोणीही आढळून येत नाही. आता घर खरेदीदारांना आपण काय उत्तरे द्यायची असे प्रश्न या भूमाफियांना पडले आहेत. या इमारतींची सर्व कागदपत्रे बनावट आहेत हे माहिती असुनही भूमाफियांनी आपणास ती कागदपत्रे खरी आहेत असे दाखवून आपणास बँकांमधून कर्ज घेण्यास भाग पाडले. पै पै जमा करून घेतलेल्या घरावर पालिकेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने या घरांंमधील नागरिक संतप्त आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५ इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यामधील एकालाही सोडणार नाही, असा इशारा दिल्याने आणि सर्व स्तरातून ही ६५ बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफिया, वास्तुविशारद, या बांधकामांना पाठिंबा देणाऱ्या पालिका, पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागल्याने बांधकामधारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

एकीकडे नागरिकांच्या नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आणि दुसरीकडे शासनाकडून अचानक कठोर कारवाई सुरू झाली तर पुन्हा चौकशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने मधला मार्ग म्हणून बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या बहुतांशी भूमाफियांनी कोकणात आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने, काहींनी उत्तराखंड, वैष्णवदेवी, काहींनी शक्तिपीठ, बारा ज्योतिर्लिंग,थंड हवेच्या ठिकाणी अशा तीर्थाटनाच्या निमित्ताने डोंबिवलीतून बाहेर जाणे पसंत केले आहे. भूमाफियांच्या या देवदर्शनाची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.