ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असल्याने येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु येथील पाणी टंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे. या कामासाठी २४ लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेने काढली आहे.

ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू केली जाते. जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते. यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते. परंतु पालिकेकडे दोनच टँकर उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. यामुळेच पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्याने घेण्यात येतात. यंदाही पालिकेने भाड्याने टँकर घेण्याचे नियोजन आखले आहे. या कामासाठी २४ लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेने काढली आहे. यानुसार पालिका खासगी टँकर भाड्याने घेऊन त्याद्वारे नागरिकांना विनामुल्य पाणी पुरवठा करणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली

हेही वाचा…घरगुती खानावळ, पोळी भाजी केंद्र दुहेरी आर्थिक कोंडीत, भाज्यांचे वाढत्या दरामुळे खर्चात वाढ

उन्हाळ्यामध्ये शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास तेथील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करता यावा, यासाठी दरवर्षी असे नियोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अशाचप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. अतुल कुलकर्णी कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका

Story img Loader