मुरबाड विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार किसन कथोरे आज एका अपघातामधून बालंबाल बचावले आहेत. म्हसा मार्गे मुरबाडमध्ये येत असताना चौकाजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रकने कथोरेंच्या गाडीला धडक दिली. यावेळी कथोरेंच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला. मात्र कथोरेंच्या गाडीचं यामध्ये नुकसान झालं आहे.
हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, या ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या अपघातामुळे परिसरात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. मात्र कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाहीये. बदलापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा