कल्याण: पतीपासून विभक्त राहत असलेल्या पुण्यातील एका महिले बरोबर बीड येथील एका इसमाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या महिलेला तीन मुले आहेत. इसमाने महिलेला लग्नाचे आमीष दाखविले. अनेक महिने उलटूनही इसम विवाह करण्यास तयार होत नसल्याने, महिलेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या १८ वर्षाच्या प्रियकराने महिलेला टिटवाळा जवळील रेवती गाव हद्दीतील जंगलात आणून तिचा साथीदारांच्या साहाय्याने निर्घृण खून केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खुनी प्रियकराला टिटवाळा पोलिसांनी बीड येथून अटक केली आहे. रुपांजली संभाजी जाधव असे मयत महिलेचे नाव आहे. जयराम उत्तरेश्वर चौरे असे प्रियकराचे नाव आहे. सुरेश धाेटे याने जयरामला महिलेच्या हत्येसाठी साहाय्य केले. पती बरोबर वाद झाल्याने रुपांजली आपल्या तीन मुलांसह आईकडे राहत होती. रोजंदारीसाठी काम शोधत असताना रुपांजीलची ओळख जयराम चौरे याच्या बरोबर झाली. दोन वर्षापासून त्यांच्यात प्रेमाचे संबंध होते. जयरामने रुपांजलीला तिच्या सोबत विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. दोन वर्ष उलटली तरी जयराम विवाह करण्याचे नाव घेत नसल्याने रुपांजलीच्या मनात संशय निर्माण झाला होता. ती प्रियकर जयरामला लग्नासाठी तगादा लावत होती. यामुळे जयराम चिंताग्रस्त झाला होता. त्याला रुपांजली बरोबर विवाह करायचा नव्हता.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : जामिनावर बाहेर आलेल्या ‘मोक्का’तील गुन्हेगाराला पुण्यात ‘मेफेड्रोन’ विकताना पकडले; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

विवाहासाठी प्रेयसी अडून बसल्याने जयरामने रुपांजलीची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी मित्र सुरेश धोटे याची मदत घेतली. आपण कल्याण भागात लग्न करण्यासाठी जाऊ असे सांगून त्याने दुचाकीवरुन रुपांजलीला पुणे येथून उल्हासनगर येथे आणले. मंगळसूत्र खरेदीचा बहाणा करुन त्यांनी उल्हासनगर मधील बाजारात दोन चाकू खरेदी केले. त्यानंतर लग्नासाठी आपण एका मंदिरात जाऊ असे म्हणून त्यांनी रुपांजलीला टिटवाळा जवळील रेवती गावच्या जंगलात आणले. तेथे गाफील असलेल्या रुपांजलीला खोल दरीत नेऊन तिचा त्यांनी निर्घृण खून केला. ३५ वार रुपांजलीवर करुन तिला ठार मारुन जयराम, सुरेश घटनास्थळावरुन पळून गेले.

हेही वाचा >>> ठाणे : भिवंडीत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट; आणखी तीन डाॅक्टर अटकेत

रेवतीच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती टिटवाळा पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी पथकासह जाऊन पाहिले तर मृतदेह छिन्नविछीन्न झाला होता. मृतदेहा जवळ रुपांजलीचे आधारकार्ड पडले होते. त्यावर लातुरचा पत्ता होता. त्याचा आधार घेत पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या आईकडून रुपांजलीची ओळख पटविण्यात आली. त्या आधारे आरोपी हा बीड जिल्ह्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे जयराम चौरे याला बीडमधून अटक केली. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.