कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागात एका तरुणाने एका सात वर्षाच्या शाळकरी मुलाची इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीला आला. या मुलाच्या आईच्या सुरक्षा रक्षक असलेल्या मित्राने हा घृणास्पद प्रकार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाल्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. या घटनेने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. प्रणव भोसले असे मृत मुलाचे नाव आहे. नितीन कांबळे असे आरोपी नाव आहे.

हेही वाचा- कोकण शिक्षकमधील कोण आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे ?

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

पोलिसांनी सांगितले, आरोपी नितीन कांबळे आणि प्रणवची आई कविता हे यापूर्वी एकेठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कविता ही एकल महिला आहे. नितीन आणि कविताची मैत्री असल्याने नितीन अनेक वेळा कविताचा मुलगा प्रणव याला शाळेत नेणे आणण्याचे काम विश्वासाने करत होता. कविता आपल्या मुला सोबत गौरीपाडा येथील सुंदर रेसिडेन्सीमध्ये राहते.

हेही वाचा- कल्याणमधील तरुणाचे मारेकरी मध्यप्रदेशातून अटक

कविता एकल महिला असल्याने नितीन तिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता. लहान मुलगा असल्याने कविता त्याला नकार देत होती. त्याचा राग नितीनला होता. या विषयावरुन नितीन आणि कविता यांच्यात वाद होत होते. कवितावरचा राग आरोपी नितीनने तिचा मुलगा प्रणव याच्यावर काढण्याचा निर्णय घेतला असावा, असा संशय पोलिसांना आहे. नेहमीप्रमाणे नितीन कांबळे प्रणवला शाळेतून आणण्यासाठी गेला. त्याने प्रणवला शाळेतून ताब्यात घेतल्यानंतर त्याला घरी न देता त्याच्या निवासाच्या इमारतीच्या गच्चीवर नेले. तेथे त्याला पाण्याच्या टाकीत बुडून मारुन टाकले, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर नितीन पळून गेला.

हेही वाचा- ठाणे : बंदूकीच्या गोळीच्या पुंगळीमुळे सापडले हत्येचा प्रयत्न करणारे गुन्हेगार

प्रणवच्या हत्येचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून नितीनने फेसबुक पानावर मजकूर प्रसिध्द करुन आपण कविताला ५० हजार रुपये दिले होते. ती रक्कम ती परत नाही. यामुळे आपणास ही महिला आणि तिचे तीन सदस्य त्रास देत आहेत. त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे म्हटले. हा प्रकार त्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. नितीनचा हा बनाव सुरू असताना प्रणवची आई मुलगा शाळेतून घरी आला नाही म्हणून त्याचा शोध घेऊ लागली. तो कोठेही आढळून येत नाही. तिने खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. कविताने नितीनकडून हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी नितीनला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. त्याने प्रणवची साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरवसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader