पाश्चिमात्य भोजनामध्ये ‘वाइन’ सर्वोत्तम महत्त्व दिले जाते. तेथील पेहराव, राहणीमान, खाद्यसंस्कृतीचे आकर्षण नेहमीच भारतीयांमध्ये दिसून येते. त् याच पाश्र्वभूमीवर ठाण्यातील ओवळा नाक्यावरील शेल्टर फार्मतर्फे वाइन टेस्टिंग फेस्टचे आयोजन केले आहे. सगळ्या प्रकारच्या महोत्सवांचा आस्वाद आपण घेतला आहे, पण काही खास महोत्सव आजवर मुंबईमध्येच होत असत. त्यापैकी एक म्हणजे मद्य महोत्सव. गेले काही दिवस खाद्य महोत्सवांची रेलचेल ठाणे शहरामध्ये सुरू आहे, परंतु आता खाद्यसोबत मद्याचाही महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ठाण्यासारख्या शहरात मद्य महोत्सव तसे तुरळक प्रमाणात होत असतात. हे लक्षात घेऊन शेल्टर फार्म व्यवस्थापनाने हा वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवात १५०० रुपयांमध्ये ग्राहकांना देशी-विदेशी प्रकारच्या विविध दर्जाच्या वाइनची चव चाखता येणार आहे. याशिवाय याच दरात हवे तेवढय़ा प्रमाणात खाद्यपदार्थावर तावही मारता येणार आहे. रेड आणि व्हाइट वाइनचे विविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कधी- रविवार, ३१ जानेवारी, सकाळी ११ पासून
कुठे- दी शेल्टर फार्म, ओवळा नाका, घोडबंदर रोड, ठाणे (प.)

पजामा पार्टीची धमाल..
कोणताही चांगला क्षण साजरा करायचा असल्यास परिचित व्यक्तींना एकत्र आमंत्रित करून पार्टी करणे हे सध्या हौशी मंडळींचे नित्याचे झालेले आहे. नृत्य आणि संगीताच्या तालावर थिरकणारी एखादी पार्टी असेल तर तरुणांची सायंकाळ-रात्र खास ठरते. या पार्टीत काही विशेष पेहराव करून जायचे असल्यास तरुण मंडळींचा उत्साह द्विगुणित होत असतो. खुश्रीन एडय़ुटेनमेंटने आयोजित केलेल्या पजामा पार्टीमध्ये सुद्धा तरुणांना भावेल असेच नावीन्य असणार आहे. या पार्टीमध्ये आपला आवडता पजामा परिधान करून नृत्य, चित्रपट, कथा, मेजवानी यांसारख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कधी- शुक्रवार, २९ जानेवारी, वेळ- सायंकाळी ६ ते रात्री १०
कुठे- खुश्रीन एडय़ुटेनमेंट, चरई, ठाणे</p>

पाडगावकरांच्या आठवणी
ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे निधन होऊन एक महिना पूर्ण होत आहे. मात्र आजोबांच्या कविता सतत जिवंत राहाव्या यासाठी त्यांचे जिवश्च कंठश्च मित्र तसेच ठाणेकर रसिक पुढे सरसावले आहेत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर एक आठवण तर आहेतच, पण त्या आठवणींची प्रत्येकाच्या मनात साठवण व्हावी यासाठी ‘मंगेश पाडगावकर एक साठवण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, जयू भाटकर आदी कवींचा सहभाग असून अनुजा वर्तक, नीलेश निरगुडकर आदी गायकांसमवेत नरेंद्र बेडेकर निवेदन करणार आहेत. सान्वा कल्चरल ग्रुपचे संयोजक संजीव मेस्त्री यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कधी- २९ जानेवारी, वेळ- सायंकाळी ७.३० वाजता
कुठे- काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर, ठाणे (प.)

भटकंती करताना छायाचित्रण
कुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात भटकंती करून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच तो त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो. हेच प्रेम इतरांनीही अनुभवावे आणि त्याच्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये साठवता याव्यात या उद्देशाने ठाण्यातील येऊर येथील पाटणपाडा येथे फोटो ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. येथील निसर्गसौंदर्य, प्राणी, पक्षी, वनस्पतींमधील वैविध्य पाहण्याची संधी या ट्रेकच्या निमित्ताने मिळणार आहे. या वेळी येताना आपला कॅमेरा आणि त्यासोबतच्या वस्तू आणणे आवश्यक आहे. सहभाग घेण्यासाठी संपर्क- ९८३३९३९४३९
कधी- रविवार, ३१ जानेवारी, वेळ- स. ६
कुठे- पाटणपाडा, येऊर, ठाणे (प.)

ग्राहकांसाठी संगीतमय संध्याकाळ
शनिवारची संध्याकाळ ही सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी. दुसऱ्या दिवशी सुट्टीचा आस्वाद घ्यायला मिळणार ही कल्पनाच मुळी आनंददायी असते. शनिवारची सायंकाळ अधिक रंगतदार करण्याची व्यवस्था यंदा विवियान मॉल व्यवस्थापनाने केली आहे. आठवडय़ाच्या प्रत्येक शनिवारी विवियाना मॉलमध्ये ‘व्ही-फॉर म्युझिक’ या लाइव्ह संगीत कार्यक्रमाचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे. संपूर्ण आठवडय़ाचा क्षीण मुक्त करण्याची उत्तम व्यवस्था म्हणजे शास्त्रीय, बॉलीवूड, मराठी, पाश्चिमात्य अशा विविध संगीताची मेजवानी रसिकांना येथे अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी, सायंकाळी ६ वाजता, विवियाना मॉल ठाणे (प.) येथे होणार आहे.
कधी- शनिवार, ३० जानेवारी, सायंकाळी ६ वाजता
कुठे- विवियाना मॉल, ठाणे (प.)

सायकलची सफर..
सध्याच्या उंची राहणीमानाच्या युगातही जुनं ते सोनं असे म्हणत काळाच्या ओघात कालबाह्य़ होत असलेल्या वस्तूंवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा स्वतंत्र वर्ग आहे. बाइक येण्यापूर्वी एखाद्याजवळ सायकल असणे हेदेखील अप्रूप होते. अलीकडे फारशा रस्त्यावर न दिसणाऱ्या या सायकली आपली आठवण म्हणून अनेकांच्या घराच्या अंगणात उभ्या असतील. यंग एन्व्हायर्न्मेंंटालिस्ट प्रोग्राम ट्रस्ट यांच्या वतीने सायकोलथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलची सफर करण्याची आवड असणाऱ्या लोकांना या निमित्ताने या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कधी- शनिवार, ३० जानेवारी, वेळ- सकाळी ७ वाजता
कुठे- हिरानंदानी इस्टेट, ठाणे

पंचमदांच्या सूरमयी स्मृती
गाणी कितीही जुनी असली तरी ‘रिश्ता नया सोच वही’ हा विचार ठेवून आरडी व एसडींची गाणी कधीही आणि कितीही वेळा ऐकली तरी मनाला उभारी मिळते. शब्द लय आणि सप्तसुरात न्हाऊन निघतात आणि निरभ्र आकाशात चांदण्या कवेत घेऊन पुन्हा मल्हार रागाची मागणी करतात. अशीच वर्षांनुवर्षे रसिकांच्या मनावर गाण्यांची भुरळ पाडणाऱ्या पंचम यांच्या गाण्याचा कार्यक्रम मंदा फाऊंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आर. डी. बर्मन यांच्यासोबत काम केलेले नितीन शंकर, आपल्या २० वादक कलाकारांसोबत ठाण्यात प्रथमच कार्यक्रम करत असून या कार्यक्रमात पाश्र्वगायक शब्बीर कुमार, जॉली मुखर्जी, बेला सुलाखे, निरुपमा डे, जितेंद्र बुरूक हे गायक गाणार आहेत
कधी- ३१ जानेवारी, वेळ- रात्री ८.३० वाजता
कुठे- गडकरी रंगयातन, ठाणे

ओ.पी. गीतांचा नजराणा
हिंदी सिनेसंगीतात अतिशय वेगळ्या ठेक्याची गाणी देणारे संगीतकार म्हणून ओ. पी. नय्यर यांची ओळख आहे. श्रोत्यांना उत्तम संगीत ऐकविणाऱ्या स्वरसाज या संस्थेतर्फे येत्या रविवारी, ३१ जानेवारी रोजी ओ. पी. नय्यर यांची १९५१ ते १९६० या काळातील निवडक सदाबहार गाणी सादर केली जाणार आहेत. अर्चना वैद्य यांच्या संग्रहातून ही गाणी निवडण्यात आली आहेत.
कधी- रविवार, ३१ जानेवारी संध्याकाळी ५.०० वाजता,
कुठे- सरस्वती क्रीडा संकुल, तळमजला, नौपाडा, ठाणे (प).

श्रीधर केळकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
कल्याणमधील चित्रकार श्रीधर केळकर गेली तीन वर्षे जानेवारी महिन्यात घरासमोरील अंगणात वर्षभरात रेखाटलेल्या निसर्ग तसेच व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन भरवितात. यंदाही २५ जानेवारीपासून आग्रा रोडवरील केळकर सदनात त्यांच्या निवडक ५० चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवार, ३१ जानेवारीपर्यंत संध्याकाळी ५ ते १० या वेळेत रसिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले आहे. कल्याणच्या नूतन विद्यालयात मुख्याध्यापक असलेल्या श्रीधर केळकरांच्या चित्रकला कारकीर्दीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. निवृत्तीनंतर स्वांत:सुखाय चित्र रेखाटण्याचा छंद कायम ठेवणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताच्या कलाकृतींचा आस्वाद घेणे निश्चितच आनंददायी आहे. यंदा हे प्रदर्शन पुढच्या अंगणाऐवजी त्यांनी परसदारी भरविले आहे.
कुठे- केळकर सदन, नमस्कार मित्र मंडळासमोर, आग्रा रोड, कल्याण (प.)
कधी- संध्याकाळी ५.०० ते १०.००, ३१ जानेवारीपर्यंत

‘बनारस’चे चित्रप्रदर्शन
सुप्रसिद्ध चित्रकार यशवंत शिरवडकर यांचं ‘बनारस’ हे चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, १६१ ब, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे मांडण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन दि.२ ते ८ फेब्रुवारी २०१६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुल राहील.
आपल्या कला कारकीर्दीतलं ९४ वं एकल प्रदर्शन मांडणारे चित्रकार यशवंत शिरवडकर बनारस विषयी खुप आस्था राखुन म्हणतात ‘बनारस हे शहर फक्त हिंदुंसाठीच तारणहार असणारं नाही तर भिन्न तत्वज्ञान आणि धारणा असणाऱ्यांसाठीही ते एक प्रेरक स्थान राहिलं आहे. तुलसीदास, शंकराचार्य, महावीर, गौतम बुद्ध यांनी या शहरामध्येच आत्मा ओतला आहे. या शहराचा माहोल आपल्या दर्शकांसमोर मांडणं हे कुठल्याही कलाकाराला आव्हानात्मकच आहे’.

‘बनारस’, इतिहासाहून जुनं असलेलं हे शहर, परंपराहून ज़ुनं धरोहर आणि ते दोन्ही एकत्र केलं तरी त्याहून पुराणं आसलेलं बनारस शहर मुंबईत जन्मलेल्या चित्रकार यशवंत शिरवडकर यांना नेहमीच आकर्षीत करीत आलं आहे. गंगेचं पवित्र जल, त्यावर सफरीसाठी तयार असणाऱ्या नौका, तिथल्या घाटांवर चालणारी पूजा-अर्चा, उपासना, भव्य मंदिरं, पुरातन संकृतीचं प्रतिक असणारी वास्तूकला हे सगंळ अचंबीत करणारं आहे. बनारसच्या प्रेत्येक घाटाला स्वत:चं असं महत्व आहे, प्रत्येकाची वेगळी अशी कहाणी आहे. हे शहर कधी अवखळ तर कधी धिरगंभीर, कधी रममाण तर कधी अलिप्त, कधी सप्तरंगात न्हाऊन निघालेले तर कधी एकतारी सारखा एकच रंग घेऊन आपल्यातच मग्न असणारं, असं असलं तरी सतत प्रवाही असणारं बनारस. या शहराचे हे वेगगेगळे अविष्कार चित्रकार यशवंत शिरवडकर यांच्या चित्रांमधून आपल्याला जाणवत राहतात. इतिहास, परंपरा, श्रद्धा या कलाकाराने सादर केलेल्या कलाकृती सर्वस्पर्शी आहेत.
गुढ अशा या बनारसचं चित्रं उभं करताना चित्रकाराने लाल, नारिंगी रंगछटांनी ते आरेखलं आहे. छाया-प्रकाशाचा खेळ, वातावरणातील गुढता कनव्हासवर चित्रीत करताना चित्रकाराने तैलरंगांचा वापर केला आहे. आपल्या देशाच्या सांकृतीत ठेवा आणि त्याचं एकच एक प्रतिक दाखवायचं झालं तर बनारसला पर्याय नाही. बनारसचा प्रत्येक कोपरा बोलका झाला तर त्याची म्हणून एक रोचक गोष्ट असणार आणि तीच सांगण्याचा प्रय चित्रकार यशवंत शिरवडकर यानी आपल्या चित्रांमधून केला आहे.
गेली चाळीसहून अधिक वर्ष भारतीय उपखंडाची चित्रंरुपं साकार करणारे चित्रकार यशवंत शिरवडकर देश-विदेशात विख्यात आहेत. ९३ एकल आणि २१५ समुह प्रदर्शनांमधून आपली कला सादर करणार्?या या चित्रकाराने बेल्जियम, नेपाळ लक्झेंबर्ग, फ्रांस, स्वित्झर्लंड, जर्मनी, युरोप, आणि अमेरिका अशा देशांना आपल्या चित्रप्रदर्शनाव्दारे कलेचा आस्वाद दिला आहे. देश आणि विदेशातील चित्रांच्या लिलावात त्यांची चित्रं नेहमीच विRिला ठेवली जातात. मुंबईकर कलारसिकांना हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.
कुठे: जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कधी : २ ते ८ फेब्रुवारी

‘होमेज टू अब्बाजी’, उस्ताद अल्लारखाँ यांना आदरांजली
आपण प्रेमाने ज्यांना ‘अब्बाजी’ म्हणतो त्या उस्ताद अल्लारखाँ यांची ३ फेब्रुवारी २०१६ ही सोळावी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने संपूर्ण भारतातून आणि जगभरातून कलाकार षण्मुखानंद हॉलमध्ये या गुरू आणि तबलानवाजाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येत आहेत. अब्बाजींनी जगभरातील अक्षरश: लाखो संगीत रसिकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले होते. अब्बाजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारम्य़ा ‘होमेज टू अब्बाजी’ला गेल्या सोळा वर्षांमध्ये शास्त्रीय संगीत विश्वमध्ये एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तो जगातील एक महत्वाचा लोकप्रिय तंतुवाद्य सोहळा म्हणून नावारूपाला आला आहे.
आपल्या आदरणीय गुरूला श्रद्धांजली अर्पण करणे हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यातही भारतीय संगीत क्षेत्रात या परंपरेला अतुल्य असे महत्व आहे. ताज महल चहा, रिलायन्स फाउंडेशन यांचे सह-सादरीकरण या कार्यRमाला लाभले असून कोटक महिंद्रा एएमसी लिमिटेड, बँक ऑफ इंडिया या कंपन्यांनी सह-प्रायोजकत्व दिले आहे. ऑर्किड हॉटेलने या सोहळ्यामध्ये आदरातिथ्य प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
‘होमेज टू अब्बाजी’ या दिवसभर चालणारम्य़ा कार्यRमाला ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता ‘ताल प्रणाम’ने सुरुवात होणार आहे. उस्ताद शुजात खान (सितार), श्रीमती आरती अंकलीकर-टिकेकर (गायन) आणि नामधारी सुखविंदर सिंग यांच्यासह नामधारी बळवंत सिंग (धृपद पद्धतीचे पंजाबी गायन) हे आघाडीचे कलाकार त्यात आपली कला सादर करतील. दुपारी सादर होणाऱ्या ‘ताल तपस्या’ची सुरुवात ११.३० वाजता होईल. त्यात विक्रम घोष (तबला), मन्नरगुडी एम आर वासुदेवन (थविल) आणि नामधारी सुखविंदर सिंग (जोरी) सहभागी होतील. संध्याकाळच्या ‘सेलिब्रेटिंग अब्बाजी’ या सत्राची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. पाश्चिमात्य ड्रमवादक विन्नी कोलायटा आणि टय़ुनिशियाचे संगीतकार धाफर युसेफ त्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्याची भव्य अंतिम सांगता झाकीर हुसेन यांच्या नेतृत्वाखालील सत्राने होणार आहे. त्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होत आहेत.
गेल्या १५ वर्षांमध्ये जगभरातील काही श्रेष्ठ कलाकारांचा सहभाग या सोहळ्यात आम्हाला लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून जगभरातील संगीताच्या अनेकविध परंपराच या व्यासपीठावर सादर होताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे,” असे उद्गार झाकीर हुसेन यांनी काढले. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सत्राच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रमाच्या एक तास अगोदर षण्मुखानंद सभागृहात मिळतील.
कुठे: षण्मुखानंद हॉल
कधी : ३ फेब्रुवारी

वन्यजीव व निसर्ग छायाचित्रांचे प्रदर्शन
जंगल, प्राणी, पक्षी, कीटक यांची जेवढी विविधता आपल्याला लाभली आहे तेवढी क्वचितच काही देशांमध्ये दिसून येते. हा समृद्ध ठेवा शहरी नागरिकांपर्यंत छायाचित्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी गेली सहा वर्षे मिड अर्थच्या वतीने वन्यजीव व निसर्ग छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाला समृद्ध असा निसर्ग लाभला असून या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचविणे व नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असून यंदा ४० छायाचित्रकारांनी टिपलेली १५० छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
कधी- १ फेब्रुवारीपर्यंत, वेळ- स. १० ते रात्री ९
कुठे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय, डोंबिवली (पू.)

थंडगार पेयांची पर्वणी खास जोडीदारासाठी
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या जोडीदाराला काही तरी खास भेट असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. यंदा आपल्या प्रियकरांना अधिक ‘कुल’ करण्यासाठी कोरम मॉलच्या माध्यमातून आणखी एक संधी चालून येत आहे. खास महिलांसाठी विविध प्रकारचे थंडगार पेय बनविण्याची कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. यामध्ये चेरी बॉम्ब, पिंक ड्रीम, टरकिश स्ट्रॉबेरी अ‍ॅण्ड रोज, क्रॉनबेरी लेमॉडे, पॉमग्रानेट स्पिर्झर, रेड हॉट व्हॅलेंटाइन, फ्लर्टी फाइव्ह अशा विविध पेयांची पर्वणी खास महिला वर्गासाठी येथे उपलब्ध आहे. येत्या बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कंपाउंड जवळ, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प.) येथे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
कधी- बुधवार, ३ फेब्रुवारी, वेळ- दुपारी ३ ते रात्री ८.
कुठे- कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी कंपाऊंड जवळ, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ठाणे (प.)

‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे कला प्रदर्शन
चित्र, शिल्प जगतातील आदराचे स्थान असलेल्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संस्थेची स्थापना १९१८ साली मुंबईमध्ये करण्यात आली. यामध्ये समकालीन अनेक प्रथितयश चित्रकार व शिल्पकारांचा पुढाकार होता. या संस्थेतर्फे विविध कलाकारांना एकत्र आणत, जनमानसामध्ये कलेला आदराचे स्थान निर्माण करण्यासाठी दरवर्षी कला प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. याशिवाय आठवडय़ातून तीनवेळा चित्रकार, शिल्पकारांसाठी सराव वर्ग घेतला जातो. अभ्यासवर्ग व चर्चासत्रेही आयोजित केली जातात.

यावेळच्या प्रदर्शनामध्ये १५०० प्रवेशिकांपैकी निवडक १५० कलाकृती मांडण्यात येणार आहे. विविध विषयांसाठी २२ बक्षिसे दिली जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा जेष्ठ चित्रकार पुरस्कारासाठी जे. एस. खंडेराव यांची निवड करण्यात आली आहे. प्रदर्शन सर्वाना मोफत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कुठे: जहांगिर कला दालन, मुंबई
कधी: २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी

स्वाती जाधव यांच्या चित्रांचे प्रदर्शन
मुंबईतील चित्रकार स्वाती जाधव यांनी साकारलेल्या निसर्ग व व्यक्तीचित्रांचे प्रदर्शन नरीमन पॉइंट येथील कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३० जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे. स्वाती यांनी अनोख्या शैलीचा व तंत्रशुद्ध मांडणीचा उपयोग करून निर्मिलेली व्यक्तीचित्रांची व निसर्गाची विविध कलात्मक रुपे व त्यातील रम्य भावनात्मक सौंदर्यपूर्ण असा उत्कट आविष्कार रसिकांपुढे चित्ररूपाने सादर केला आहे.
निसर्गापासून प्रेरणा घेऊन मुख्यत: राजस्थानी व इतर ग्रामीण स्त्रिया, त्यांचे भावविश्व तसेच त्या परिसरातील निसर्ग, तेथील जनजीवन आणि संस्कृती ह्य़ाभोवती चित्रसंकल्पना गुंफली आहे.
कुठे: कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, नरीमन पॉईंट
कधी: २९, ३० जानेवारी

Story img Loader