लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : तुम्हाला गोर गरीबांच्या घरांचे, इमारतींचे फेसबुक लाईव्ह करण्याची आवड आहे ना, आता तुमच्या येऊर येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या बंगल्याचे फेसबुक लाईव्ह होणार असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे, आम्ही त्यांच्या मागे लागणार असेही मुल्ला यांनी सांगितले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले होते. त्यास प्रत्त्युत्तर म्हणून नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केले. मी कधीही अनैतिकतेने पैसे कमविले नाहीत. परंतु तुमचा बंगला कुठून आला. त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत?, बंगला मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिले नाहीत, ईडी प्रकरणात चौकशी सुरू असलेला केडीया कोण याची सुद्धा चौकशी होणार असल्याचेही मुल्ला म्हणाले. आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे. आम्ही त्यांच्या मागे लागणार असेही मुल्ला यांनी सांगितले.

तुम्ही आमदार म्हणून निवडून आले. तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केले आहे. मंत्री असताना तुम्हाला एका व्यवहारात पेडर रोड भागात अडीच हजार चौ. फूटाची सदनिका दिली होती असा आरोपही त्यांनी केला. अभिजीत पवार याने तुमच्या मालमत्ते बाबत सांगितले आहे, ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवले आहे. वेळप्रसंगी आम्ही पोलिसांना ते सर्व सादर करू असेही मुल्ला म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत अनेक गुंड, हत्याकरणाऱ्यांसोबत छायाचित्र आहेत. ते फेसबुकवर दिसते आहे असेही मुल्ला यांनी सांगितले.

बांधकाम व्यवसायिक परमार यांच्या प्रकरणात कोणी पैसे घेतले, पण बळी मी झालो. परमार यांना रात्री किती वाजता दम देण्यात आला. मी बळी झालो कारण तुम्हाला वाचविण्यासाठी असेही मुल्ला म्हणाले. हे सर्व प्रकरण आम्ही बाहेर काढणार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला.

Story img Loader