ठाणे : नाताळला नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेट म्हणून केक, कुकीज आणि चॉकलेट लागतातच. मग त्यासाठी खरेदीचाही उत्साह आला. ग्राहकाच्या भूमिकेतून नाताळ पाहण्याची तशी प्रथा नाही. हौसेला मोल नसतं. जे हवं ते खरेदी करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे नाताळ. हे सारं परंपरेने आलेले आहे. तसं चवीलाही मोल नसतं, असं म्हणावं लागेल. जिभेचे सारे कोड पुरवणारी असते ती गोष्ट म्हणजे सुकामेवा. या सुकामेव्याच्या थरांनी सजलेली नानकटाई, विविध आकाराची सुकामेव्यांनी भरलेले चॉकलेट नाताळात खाणं म्हणजे पर्वणीच.

आबालवृद्धांना केक, नानकटाई, चॉकलेटचे आकर्षण असते. नाताळ सणासाठी केक हा सर्वात प्रिय. नाताळ सणाचे ते मुख्य आकर्षण म्हणता येईल. ठाण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ब्राउनी जार, चॉकलेट बदाम ब्राऊनी, सांता, ख्रिासमस ट्रीच्या आकाराच्या नक्षीकाम केलेल्या ब्राउनीज ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. हलवायांकडील समृद्ध प्लम केकसह फळांसोबत सुकामेव्याचा अप्रतिम स्वाद, मावा केक, विविध फळांच्या चवीने ओतप्रोत केक उपलब्ध आहेत. नाताळचा गोडवा द्विगुणित करण्यासाठी बेकऱ्याही विविध आकाराच्या आणि चवीच्या केकनी सजल्या आहेत.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली

हेही वाचा – कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

u

आकर्षक ब्राउनीज

यंदाच्या नाताळात विविध चवींनी भरलेले केक, ब्राउनीज, नानकटाई आणि चॉकलेट्स या सणाचा गोडवा अधिक वाढवणार आहेत. कार्यालय, गृहसंकुले, चर्च, शाळा आणि महाविद्यालयांत नाताळसाठी सजावट करण्यात आली आहे. विविध ठिकाणी विद्याुत रोषणाईही आहे. विविध आकारातील सांताक्लॉज, सजावटीचे कृत्रिम सामान, सांताचा पोशाख, मेणबत्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नाताळला सामूहिक प्रार्थनेनंतर केक कापून त्याचे वाटप केले जाते.

Story img Loader