पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. यामध्ये भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांचीही वर्णी मोदींच्या कॅबीनेटमध्ये लागलीय. कपिल पाटील यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान मिळालं आहे. कपिल पाटील हे समुद्धी महामार्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पाठीराखे आहेत.

कपिल पाटील यांचं पूर्ण नाव कपिल मोरेश्वर पाटील असं असून त्यांचा जन्म ५ मार्च १९६१ रोजी झालाय. त्यांनी बी.ए.पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. कपिल पाटील यांची सध्याची मोठी आणि महत्वाची ओळख म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय शिलेदार. २०१४ साली कपिल पाटील राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर असताना त्यांनी काळाची पावलं ओळखून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

नक्की पाहा >> PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातून ‘हे’ दहा मंत्री OUT; राज्यातील दोन मंत्र्यांचाही समावेश

कपिल पाटील १९८८ साली पहिल्यांदा दिवे-अंजुर ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून निवडून आले आणि राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी अनेक पदं भूषवली. ठाणे जिल्हापरिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर कपिल पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर कपील पाटील यांची राजकीय कोंडी होऊन त्यांच्या प्रवासला खीळ बसतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी कपिल पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.

नक्की  वाचा >> Cabinet Expansion: अखेर ठरलं! मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ ४३ मंत्र्यांचा होणार समावेश, पाहा संपूर्ण यादी

भाजपात जाण्याच्या त्यांचा निर्णय अगदी पथ्यावर पडला. भाजपात प्रवेश करताच ते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बनले. २०१४ साली कपिल पाटील यांना भिवंडी मतदार संघातून लोकसभेचं तिकीट मिळालं आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले.२०१९ मध्ये पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी केंद्रात विविध संसद समित्यांवर सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. लोकसभेत त्यांनी पक्षाचे व्हीप म्हणून जबादारी पार पाडली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल.

कपिल पाटील यांच्यासोबतच डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि नारायण राणेही केंद्रात मंत्री झाले आहेत. मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झालाय. यात एकूण चार खासदारांना संधी मिळाली आहे तर केंद्रातील महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

Story img Loader