लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : बॉलीवूड चित्रपट अभिनेते सैफ अली खान यांच्या वरील हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट ) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचे, वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे अशी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्यावर ट्विटर द्वारे केली.

बॉलीवूड चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर एकाने चाकू हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. त्यावेळी आव्हाड यांनी अनेक आरोप केले होते. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले होते की, प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले.

आणखी वाचा-ठाणे : कांदळवनाच्या जंगलात असा सापडला सैफ अली खानचा हल्लेखोर

तैमुर समाज माध्यमांन मध्ये जग भरात प्रचंड लोकप्रिय झाला नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून ,प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही.

तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे.असे ट्विट केले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mhaske criticizes jitendra awhad after saif ali khans attacker proved bangladeshi mrj