शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार राजन विचारे यांना मच्छर जरी चावला तरी ते म्हणतील की मुख्यमंत्र्यांनी हा मच्छर पाठवला आहे, अशी टीका बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच राजन विचारे मुख्यमंत्र्यांना एवढे घाबरत आहेत की, रात्री त्यांना स्वप्नात देखील मुख्यमंत्री दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा- भारत जोडो यात्रेमध्ये हे काय घडलं? शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना वाजले फटाके, राहुल गांधी संतापले

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर किसन नगर येथील घटनेनंतर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे रद्द करून सामाजिक शांततेसाठी खऱ्या गुन्हेगारांना अटक करा. अशी मागणी ठाणे खासदार राजन विचारे यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली आहे. त्यावर बाळासाहेबांची शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी भाष्य करत विचारे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस पायदळी तुडवत आहे; उदय सामंत यांची टीका

योगेश जानकर यांना धक्काबुक्की झाल्यानंतर सर्व भटवाडीतील नागरिक खाली उतरले. तसेच जवळील कार्यकर्त्यांना पकडले, त्यावेळी खासदार स्वतः रिक्षातून पळाले. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या सात ते आठ कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी त्यांची चूक मान्य केली, असे नेते असतील आम्हाला माहीत नव्हते, असे म्हस्के यांनी म्हटले आहे. तसेच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.