ठाणे : विधानसभा निवडणुकांपुर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीत कोपरी प्रभागातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विरोधात नगरसेवक पदाची निवडणुक लढून दाखवा आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणुक लढा, असे खुले आव्हान बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. तसेच आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी कुणीही अडविलेले नसल्यामुळे राजीनामा द्या, उगाच वायफळ बडबड करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा देऊन वरळीतून निवडणुक लढा, असे आव्हान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी दिले होते. त्यानंतर आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दुसरे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो, असे आव्हान आदित्य यांनी दिले आहे. त्यास आता बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले.
हिम्मत असेल तर माझ्यासमोर नगरसेवकांची निवडणुक लढा; नरेश म्हस्के यांनी दिले आदित्य ठाकरेंना खुले आव्हान
आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी कुणीही अडविलेले नसल्यामुळे राजीनामा द्या, उगाच वायफळ बडबड करू नका,
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-02-2023 at 18:05 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mhaske open challenge to aditya thackeray for corporator election in thane zws