ठाणे जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये रविवार, ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होईल, असे प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा पुढील चोवीस तास बंद राहणार

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, १३८ एन. आय. ॲक्ट अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा या क्रमांकावर ०२२-२५४७६४४१ संपर्क करावा. सर्व पक्षकारांनी प्रंलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी केले आहे.

Story img Loader