ज्याच्यातून आपणा सर्वाची निर्मिती झाली, तो निसर्ग समजून न घेता मानवाने उलट त्याची अपरिमित हानी केल्याची खंत मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता आणि पर्यावरणीय मोबाईल अॅप तयार करणारे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यकर्ते विनायक कर्णिक यांनी येथे केले.
येथील मराठी विज्ञान परिषदेच्या वर्गात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रविवारी संध्याकाळी येथील भगिनी मंडळ शाळेच्या सभागृहात झालेल्या या समारंभात उद्योजक आनंद जयवंत यांच्या हस्ते कर्णिक यांचा शाल श्रीफळ, तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय रुजवा. मुलांनी टक्कय़ांसाठी नव्हे  तर सखोल माहितीसाठी अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader